शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१२६३ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:02 IST

जिल्ह्यात १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे १२६३ घरांची पडझड झाली. तर गोठ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.

ठळक मुद्देतीन दिवस झालेल्या पावसाचा फटका : प्रशासनाचे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे १२६३ घरांची पडझड झाली. तर गोठ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नागरिकांची ओरड वाढल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे १६ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर ११२३ घरांचे अशंत: नुकसान झाले. १२९ जनावरांचे गोठे सुध्दा कोसळल्याने पशुपालकांना आर्थिक फटका बसला. पावसाचा सर्वाधिक फटका गोंदिया, गोरेगाव, आमगाव, सालेकसा तालुक्यातील नागरिकांना बसला. पावसामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये गोंदिया २२६, तिरोडा, ८५, गोरेगाव २८४, अर्जुनी मोरगाव ७०, देवरी ४५, आमगाव ३०६, सालेकसा ५९, सडक अर्जुनी ४७ घरे पडून नुकसान झाले. गोंदिया तालुक्यात ११, तिरोडा ४, अर्जुनी मोरगाव १, देवरी तालुक्यातील १ असे एकूण १६ घरे पूर्णपणे कोसळल्याने कुटुंबीयांवर उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. जिल्हा प्रशासनाने ११२२ पैकी केवळ ५९७ घरांचे नुकसान भरपाई देण्याचा अहवाल तयार केल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक जण शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.कृषी विभागाचा अहवाल भोवणारजिल्ह्यात १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची रोवणी व धानाची पºहे वाहून गेली. तर पावसामुळे बांध्या फुटल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मात्र कृषी विभागाने पावसामुळे शेतीचे कोणतेच नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे.प्रकल्पांतील पाणी साठ्यात वाढ१५ ते १७ जुलै दरम्यान जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात पडणाºया पावसाची सरासरी गाठल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.