शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘भरारी’तून तयार होताहेत १२ हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

नरेश रहिले गोंदिया : जिल्ह्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत नाही, त्यांनी मोठे यश प्राप्त करावे, यासाठी ...

नरेश रहिले

गोंदिया : जिल्ह्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत नाही, त्यांनी मोठे यश प्राप्त करावे, यासाठी गोंदिया जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांच्या संकल्पनेतून इयत्ता ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘भरारी २०२१’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. मागच्यावर्षी वर्षभर कोरोनामुळे शाळा बंद असल्याने गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण दिले. इयत्ता ५ वीचे ९९७२, तर ८ वीचे २७१३ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उतरले आहेत.

कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने बंद असलेल्या शाळांचा फायदा घेण्यासाठी शिष्यवृत्तीची तयारी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली आहे. ऑनलाईन शिकवणी वर्ग या उपक्रमातून घेण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील हुशार व कर्तबगार विद्यार्थ्यांनी घरबसल्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यास मदत झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेकरिता पात्र विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गाचा लाभ दिला आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा बंद असल्याने वर्ग हे गावातील योग्य ठिकाणी किंवा समाज मंदिरात विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आले. ग्रामीण भागात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ॲन्ड्राॅईड मोबाईल उपलब्ध नसल्याने मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील शिष्यवृत्ती पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी वर्गाचा लाभ देण्यात आला. या विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित व बुध्दिमत्ता चाचणीच्या दोन सराव परीक्षा घेण्यात येत आहेत. शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऑगस्ट रोजी असल्याने त्यासाठी सराव परीक्षा पहिली ३० जुलैला, तर दुसरी ५ ऑगस्टला घेतली जाणार आहे. या उपक्रमासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, संगणक प्रोग्रामर नीतेश खंडेलवाल, विषय सहायक सुभाष महारवाडे, संदीप सोमवंशी, गौतम बांते, आशिष वागदेवे, नरेंद्र गौतम, तारेंद्र ठाकरे, परमानंद रहांगडाले, मुकेश रहांगडाले, सुनील हरिणखेडे, मधुकर शेंडे, माणिक शरणागत, शालीक कठाणे, हुमेंद्र चांदेवार, नरेश गोंडाणे यांनी सहकार्य केले.