शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इर्री ग्रामपंचायतला १२ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:58 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पांदन रस्त्यावर टाकण्यात आलेले मुरूम इर्री ग्रामपंचायतच्या अंगलट आले आहे. ना मंजुर गटातून या मुरूमचे खोदकाम करण्यात आल्याने तहसीलदारांनी इर्री ग्रामपंचायतला १२ लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नव्हे तर, दंडाची रक्कम त्वरीत भरण्याचे आदेश १६ जुलै रोजी काढले आहेत.

ठळक मुद्देनामंजूर गटात मुरूम खोदले : दंड त्वरीत भरण्याचे काढले आदेश

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पांदन रस्त्यावर टाकण्यात आलेले मुरूम इर्री ग्रामपंचायतच्या अंगलट आले आहे. ना मंजुर गटातून या मुरूमचे खोदकाम करण्यात आल्याने तहसीलदारांनी इर्री ग्रामपंचायतला १२ लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नव्हे तर, दंडाची रक्कम त्वरीत भरण्याचे आदेश १६ जुलै रोजी काढले आहेत.ग्राम इर्री येथे पांदन रस्त्यासाठी लागणारे मुरूम गट क्रमांक ९४८ आराजी ४ हेआर पैकी १ हेआर जागेतून काढण्याची मंजुरी तहसीलदारांनी दिली होती. मंजुरी देण्यात आलेल्या या गटातून २८० ब्रास मुरूम काढायचे होते. त्यासाठी एक लाख ३५ हजार १६० रूपयांची रॉयल्टी ग्रामपंचायतमार्फत भरण्यात आली होती. परिणामी, त्या बाबत ७ जून २०१६ रोजी ग्रामपंचायतला आदेश देण्यात आले होते. परंतु, तहसीलदारांनी मंजुरी दिलेल्या गट क्रमांक ९४८ मधून मुरूम खोदकाम न करता मंजुरी नसलेल्या गट क्रमांक ५४३ आराजी ८.४९ हेआर या तलावाच्या जागेतून मुरूमाचे खोदकाम करण्यात आले. घडलेल्या प्रकारावर आक्षेप घेत सहेसराम श्रीराम उपवंशी यांनी १५ डिसेंबर २०१७ रोजी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. यासंदर्भात ग्राम कामठा येथील मंडळ अधिकारी ए.आर.कोरे यानी चौकशी करून अहवाल सादर केला होता. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या मौका चौकशीत गट क्रमांक ९४८ आराजी ४ असून पहाडी मलमा आहे. त्या ठिकाणी कुठलेही खोदकाम नाही. परंतु, गट क्रमांक ५४३ ची मंजुरी नसताना या तलावातून खोदकाम करण्यात आल्याचे त्यांनी चौकशी अहवालात नमूद केले.याप्रकरणी २३ मार्च २०१८ रोजी ग्राम इर्रीच्या सरपंच दुर्गा लखनलाल मेंढे व ग्रामसेवक व्ही.आर.मसराम यांची सुनावणी झाली व त्यात त्यांनीही कबुली दिली होती. परिणामी, २८० ब्राम मुरूमाचे बाजार मुल्य सिएसअर प्रमाणे २८५ घनमीटर मुल्यानुसार दंड आकारण्यात आला आहे.२८० ब्रास मुरूमाचे खोदकामग्राम इर्री येथील अवैध मुरूम खोदकाम प्रकरणी गोंदिया ग्रामीणचे तहसीलदार सी.आर.भंडारी यांनी प्रकरणी इर्री ग्रामपंचायतला १२ लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावला आहे. त्याच मुरूमाचे बाजारमुल्य सिएसआर प्रमाणे प्रती घनमीटरच्या दराने प्रती ब्रास ८०३.७० पैसे नुसार पाच पट दंडाची रक्कम ११ लाख २५ हजार १८० रूपये तसेच दंड-स्वामीत्वधन एक लाख १२ हजार रूपये आणि भुपृष्ठ भाडे सहा हजार ५०० रूपये असा एकूण १२ लाख लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.सरपंचाने खोदकाम केल्याची ग्रामसेवकाची कबुलीप्रकरणी ग्राम इर्रीचे ग्रामसेवक व्ही.आर.मसराम यांची सुनावणी झाली. सुनावणीत मसराम यांनी सदर अवैध खोदकाम सरपंचांनी केल्याची कबुली दिली. मंजुरी नसलेल्या गट क्रमांक ५४३ मधून सरपंचांनी खोदकाम केल्याचे मसराम यांनी तहसीलदारांसमक्ष सुनावणीत सांगीतले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत