शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

११.४८ टक्केच निधी खर्च

By admin | Updated: August 15, 2015 01:41 IST

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०१५-१६ करिता वितरित निधीच्या केवळ ११.४८ टक्केच निधी गेल्या चार महिन्यात खर्च झाला आहे.

नियोजन समितीची बैठक : तीन महिन्यांत खर्चाचे नियोजन करणारगोंदिया : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०१५-१६ करिता वितरित निधीच्या केवळ ११.४८ टक्केच निधी गेल्या चार महिन्यात खर्च झाला आहे. प्राप्त निधीच्या तुलनेतील हा खर्च केवळ ५.६ टक्के आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात निधीचा विनियोग लावण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ना.राजकुमार बडोले यांनी दिले.समितीची बैठक शुक्रवारी (दि.१४) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, खासदार अशोक नेते, आ.गोपालदास अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, पालक सचिव डॉ.पी.एस. मीना, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी दिलीप गावडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, नगर परिषदेतील जिल्हा नियोजन समितीवर असलेले सदस्य तथा कार्यान्वित यंत्रणांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.या बैठकीत मार्च २०१५ अखेर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या १७६ कोटी ७८ लाख, २३ हजार रुपयांच्या एकूण खर्चास मान्यता देण्यात आली. हा खर्च एकूण तरतुदीच्या ९९.०३ टक्के आहे. आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये १८२ कोटी ४५ लाख ९४ हजाराची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी १७८ कोटी ५१ लाख ४६ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. वर्ष २०१५-१६ करिता अर्थसंकल्पीय तरतुदीत मोठी वाढ करून २२३ कोटी ३० लाख ३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी १९१ कोटी ३० लाख ४९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला तर ८७ कोटी ६६ लाख ११ हजारांचा निधी वितरित करण्यात आला. मात्र त्यापैकी एप्रिल ते जुलै या चार महिन्यात केवळ १० कोटी ६ लाख २४ हजार खर्च करण्यात आले. त्यात सर्वसाधारण योजनांवर २ कोटी ५३ लाख ३५ हजार, आदिवासी उपयोजनांवर ५१ कोटी ९ लाख ३१ हजार, ओटीएसपी योजनांवर २३ कोटी ३ लाख ५८ हजार तर अनुसूचित जाती उपयोजनांवर कोणताही खर्च झाला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)आचारसंहितेमुळे निधीची विल्हेवाट लागण्यास उशीरगेल्या काही दिवसात सतत झालेल्या निवडणुका आणि आचारसंहितेमुळे निधीची योग्य विल्हेवाट लावणे शक्य झाले नसल्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी नियोजन समितीच्या सभेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.