शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येची ११४ प्रकरणे अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:41 IST

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. आधीच शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आता प्रशासकीय धोरणांचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात मागील १८ वर्षात २५२ शेतकरी आत्महत्यांपैकी तब्बल ११४ शेतकºयांच्या आत्महत्या मदतीस अपात्र ठरविल्या आहे. त्यामुळे मदत मिळावी यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पायपीट सुरू आहे.

ठळक मुद्दे१८ वर्षात २५२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या : १३६ शेतकऱ्यांना दिली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. आधीच शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आता प्रशासकीय धोरणांचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात मागील १८ वर्षात २५२ शेतकरी आत्महत्यांपैकी तब्बल ११४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीस अपात्र ठरविल्या आहे. त्यामुळे मदत मिळावी यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांची पायपीट सुरू आहे.गोंदिया जिल्ह्यात २००२ व २००३ या वर्षात प्रत्येकी एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. सन २००४ मध्ये ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. सन २००५ मध्ये आत्महत्या करणाऱ्या ६ शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. सन २००६ मध्ये २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. सन २००७ मध्ये १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील २ शेतकरी आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आल्या. २००८ मध्ये १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरल्या. २००९ मध्ये १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे नोंद करण्यात आली. परंतु यातील ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जामुळे नसल्याचे ठरवून मदत दिली नाही.२०१० मध्ये २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. २०११ मध्ये १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील ३ शेतकऱ्यांचे कर्ज नसल्यामुळे त्या आत्महत्यांना अपात्र ठरविण्यात आले. २०१२ मध्ये १० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरल्या. सन २०१३ मध्ये ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यातील दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. २०१४ मध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आहेत.२०१५ व २०१६ मध्ये प्रत्येकी ३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.यातील दोन्ही वर्षात प्रत्येकी २१-२१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरल्या आहेत. सन २०१७ मध्ये १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरल्या. सन २०१८ मध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील १२ शेतकºयांच्या कुटुंबीयांना मदत नाकारण्यात आली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या २५२ पैकी फक्त १३६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रूपयाची मदत देण्यात आली.आत्महत्येचे सत्र सुरूचजिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्यामध्ये वाढ होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. सन २०१९ या वर्षातही जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नाही. चौकशीकरीता सदर प्रकरण असल्याचे पुढे आले आहे.अपात्रतेसाठी वेगळीच कारणेसततची नापीकी, दुष्काळ यामुळे शेती तोट्याची होत चालली आहे. त्यामुळे शेती करणाºया शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते. परंतु त्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ आणि यातून आलेल्या नैराश्यापोटी शेतकरी आत्महत्या करतो.त्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले नाही म्हणून त्या शेतकरी आत्महत्येला मदतीपासून नाकारण्यात येत आहे. उसणवारीवर घेतलेल्या पैशाकडे शासन लक्ष देत नसून शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरवित आहे.