शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

११ हजार बालकांनी घेतला शाळाप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 01:17 IST

‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी २८ मार्च रोजी जिल्ह्यातील १ हजार ६९ शाळांमध्ये करण्यात आली.

अभियानाची फलश्रृती : जिल्हा परिषदेच्या शाळांत ‘गुढीपाडवा-प्रवेश वाढवा’ गोंदिया : ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी २८ मार्च रोजी जिल्ह्यातील १ हजार ६९ शाळांमध्ये करण्यात आली. पुढच्या सत्रात १३ हजार ६११ बालकांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट ठरले होते. त्यापैकी १० हजार ९२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सुसज्य शाळांमध्ये मंगलमय शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. प्रत्येक मुल शिकावे व टिकावे यासाठी शिक्षण विभागातील यंत्रणेमार्फत या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले होते. सन २०१७-१८ या वर्षाकरिता जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने शासन निर्णयानुसार २६ जून २०१७ पासून राबविण्यात येणाऱ्या पटनोंदणी पंधरवाड्याची वाट न पाहता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पालक-शिक्षक आणि पर्यवेक्षक यांच्या मदतीने बालकांना शाळेत प्रवेश देण्यात आला. मागील वर्षी या उपक्रमा दरम्यान एकाच दिवशी १० हजार बालकांना प्रवेश देण्यात आला होता. यंदा १० हजार ९२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नवागतांचे स्वागत, मोफत गणवेश व मोफत पाठ्यपुस्तके देऊन करण्यात आले होते. यंदा आमगाव तालुक्यातील ११६ शाळांमध्ये १४५४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना ९१३ बालकांना, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३८ शाळांमध्ये १७३५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना ११०२ बालकांना, देवरी तालुक्यातील १४४ शाळांमध्ये १८८१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना १५०४ बालकांना, गोंदिया तालुक्यातील १८८ शाळांमध्ये ३०८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना २७८२ बालकांना, गोरेगाव तालुक्यातील १०९ शाळांमध्ये १६०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना १३८९ बालकांना, सडक-अर्जुनी तालुक्यातील ११५ शाळांमध्ये १५०२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट असताना १२०८ बालकांना, सालेकसा तालुक्यातील १२० शाळांमध्ये ९४५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना ८१३ बालकांना, तिरोडा तालुक्यातील १३९ शाळांमध्ये १४१४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना १२११ बालकांना प्रवेश देण्यात आले. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १ हजार ६९ शाळांमध्ये १३ हजार ६११ बालकांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट होते यात १० हजार ९२२ बालकांचे नाव दाखल करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)