नियम मोडणाऱ्यांची गय नाही : तीन दिवसांत एक लाख २० हजारांचा दंड वसूलगोंदिया : गोंदिया उपविभागीय कार्यलयामार्फत राबविण्यात आलेल्या गोंदिया शहर, ग्रामीण, रामनगर, रावणवाडी येथे शनिवारी राबविलेल्या मोहीमेत रॅश ड्रायव्हींग व ट्रीपल सिट बसून वाहन चालविणाऱ्या १०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर अवैध वाहतुक करणाऱ्या २० वाहनांवर तर इतर १०० वाहनांवर अश्याव २२६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्या २२६ वाहन चालकांकडून ३६ हजार १०० रूपयाचा दंड वसूल करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यात भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनांमुळे बरेच अपघात घडतात. ज्या ठिकाणी बरिच गर्दी सते अश्या ठिकाणीही तरूण मंडळी आपले वाहन जोमाने हाकत असतात. त्या रॅश ड्रायव्हींग करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याच बरोबर आपल्या वाहनांवर ट्रिपल सिट बसवून जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. अश्या १०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांकडून दंड म्हणून ११ हजार ९०० रूपये दंड वसूल करण्यात आला. अवैध प्रवास करणारी २० वाहने पकडण्यात आली. इतर स्वरूपाची १०० वाहने पकडण्यात आली. त्यांच्याकडून २४ हजार २०० रूपयाचा दंड वसूल करण्यात आला. वाहतुक नियंत्रण शाखेने ढिमरटोली चौक, मरारटोली टी पार्इंट, फुलचूरनाका परिसरात नाकाबंदी केली होती त्यांनी २४० वाहनांची तपासणी केली. त्यांनी एकूण १८० वाहनांवर कारवाई केली असून त्यांच्या जवळून २३ हजार ५०० रूपये दंड आकारला आहे. रावणवाडी पोलिसांनी त्रिमूर्ती चौक, कोरणी नाका येथे नाकाबंदी केली. त्यांनी एकूण ५७ वाहनांची तपासणी केली.२५ वाहनांकडून १ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. रामनगर पोलिसांनी कुडवा नाका येथे नाकाबंदी करून ५० वाहनांची तपासणी केली. २२ वाहनांवर कारवाई करून १० हजार २०० रूपये दंड वसूल केला आहे. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी खमारी नाका येथे २२ वाहनांची तपासणी केली. त्या ९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ९०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. गोंदिया शहर पोलिसांनी एकही कारवाई केली नाही.मागील तीन दिवस केलेल्या कारवाईमुळे एक लाख २० हजार रूपयाचा दंड शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, उपविभागीय अुधकारी अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनात वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
ट्रीपल सिटची १०६ वाहने पकडली
By admin | Updated: November 9, 2014 22:31 IST