शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत १०६ बसफेऱ्या रद्द

By admin | Updated: August 6, 2014 23:53 IST

मंगळवारी (दि.५) आलेल्या संततधार पावसाने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळील झाले होते. नदी-नाल्यांना पूर आले. अनेक ठिकाणची वाहतून ठप्प पडली. त्यामुळे ५ व ६ आॅगस्ट या दोन दिवसांत

रजेगाव पूल सुरू : देवरीत म्हैस वाहून गेलीगोंदिया : मंगळवारी (दि.५) आलेल्या संततधार पावसाने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळील झाले होते. नदी-नाल्यांना पूर आले. अनेक ठिकाणची वाहतून ठप्प पडली. त्यामुळे ५ व ६ आॅगस्ट या दोन दिवसांत गोंदिया आगाराच्या एकूण १०६ फेऱ्या रद्द होवून पाच हजार ५२४ किमीचा प्रवास बसेस करू शकल्या नाहीत. पुजारीटोला धरणाची ८ दारे ६० सेंमीने तर शिरपूर जलाशयाची ७ दारे ६० सेंमीने उघडण्यात आले आहेत. कालीसराड जलाशयाची दारे बुधवारी सकाळी बंद करण्यात आली. कालीसराड आणि शिरपूर धरणाचे पाणी पुजारीटोला धरणात येत आहे. रजेगाव पुलावर बुधवारी सायंकाळी ५० सेंमीपर्यंत पाणी वाहात असून रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत पुलावरील पाणी कमी होऊन वाहतूक सुरू होईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.५ आॅगस्ट रोजीच्या संततधार पावसामुळे रजेगाव येथील वाघनदीवरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे गोंदिया आगाराच्या गोंदिया-रजेगाव-बालाघाट या मार्गाच्या एकूण ४५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. कामठा-गिरोला मार्गावरील घाटटेमणी येथील नाल्यात वाघनदीचे पाणी उलटे शिरत आले. त्यामुळे घाटटेमणीच्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहात होते. त्यामुळे गोंदिया आगारातून धावणाऱ्या कामठा-गिरोला मार्गावरील दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ११३ किमीचा प्रवास बसेस करू शकल्या नाही. तसेच गंगाझरी ते दवनीवाडा मार्गावरील खळबंदा जवळील नाल्याच्या पुलावर पुराच्या पाण्यामुळे तीन ते चार फूट खोल मोठा खड्डा पडल्याने या मार्गावरील वाहतून बंद पडली होती. त्यामुळे गंगाझरी-दवनीवाडा या मार्गावरील गोंदिया आगाराच्या सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे २३० किमीचा प्रवास गोंदिया आगाराच्या बसेस करू शकल्या नाही. त्यामुळे ५ आॅगस्ट रोजी गोंदिया आगाराच्या एकूण ५३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या व बसेस एकूण दोन हजार ७६२ किमीचा प्रवास करू शकल्या नाही. हीच स्थिती दुसऱ्या दिवशी ६ आॅगस्ट रोजी सुद्धा होती. त्यामुळे एवढ्याच फेऱ्या व किमीचा प्रवास रद्द करण्यात आला. त्यामुळे या दोन दिवसात गोंदिया आगाराच्या एकूण १०६ फेऱ्या रद्द झाल्या व एकूण पाच हजार ५२४ किमीचा प्रवास होवू शकला नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला या रद्द झालेल्या किमीचा तोटा सहन करावा लागेल. याशिवाय वाघ नदीला आलेल्या पुरामुळे तिरोडा आगाराच्या तिरोडा-रजेगाव-बालाघाट या मार्गाच्या एकूण १६ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. एकंदरीत या दोन दिवसात अनेक ठिकाणचा संपर्क तुटला तर काही ठिकाणी नुकसानही झाले. देवरी तालुक्यातील नेताखेडा येथील रहिवासी चिंतामन बलसिंग धानवा यांची म्हैस नेताखेडा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. ही घटना मंगळवार (दि.५) सायंकाळी ४ वाजता घडली.