शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

विदर्भ राज्यासाठी १०५० किमीची पदयात्रा

By admin | Updated: August 20, 2014 23:36 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ जॉईन्ट अ‍ॅक्शन कमिटीच्या वतीने नागपूर ते दिल्ली अशी १०५३ किलोमीटरची पदयात्रा काढून पंतप्रधानांना निवेदन दिले जाणार आहे.

दिल्लीत धडक देणार : सप्टेंबरला होणार सुरूवातगोंदिया : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ जॉईन्ट अ‍ॅक्शन कमिटीच्या वतीने नागपूर ते दिल्ली अशी १०५३ किलोमीटरची पदयात्रा काढून पंतप्रधानांना निवेदन दिले जाणार आहे.विदर्भ प्रांतावर गेल्या ५४ वर्षांपासून अन्यायाची परंपरा सुरू आहे. त्यामुळे अ‍ॅक्शन कमिटीचे ५४ कार्यकर्ते ५ राज्यांमधून पायी प्रवास करणार आहेत. शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला सुरू होणारी ही पदयात्रा महात्मा गांधीच्या जयंतीला २ आॅक्टोबरला दिल्लीत पोहोचणार असल्याची माहिती विदर्भ जॉईन्ट अ‍ॅक्शन कमिटीचे सरचिटणीस अहमद कादर यांनी दिली. दरररोज ४० ते ४५ किलोमीटर पायदळ प्रवास करून हे कार्यकर्ते महाराष्ट्रात ८० किमी, मध्यप्रदेशात ५५० किमी, उत्तर प्रदेशात २५० किमी, राजस्थानमध्ये ६० किमी, हरियाणात ८० किमी व दिल्लीत ४० किमी याप्रमाणे एकूण १०५० किमी प्रवास ३० दिवसात पूर्ण करणार आहेत. विदर्भातील नागरिकांनी आपल्या परीने या पदयात्रेत सहभागी व्हावे तसेच विदर्भातील विविध सामाजिक संघटना, ग्रामपंचायतींनी आपआपल्या संस्थेत ठराव पारित करून संघटनेकडे द्यावे. हे ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवून गोवा राज्याप्रमाणे स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घ्यावी, अशी मागणी करणार असल्याचे यावेळी विदर्भ नाग समितीचे निमंत्रक प्र्रभाकर कोंडबत्तुनवार यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला दिनदयाल नौकरिया, नाग विदर्भ समितीचे जिल्हाध्यक्ष छैलबिहारी अग्रवाल, उपाध्यक्ष बलदेव सोनवआने, सचिव सुरेश लालवानी, जिल्हा प्रवक्ता हमीद सिद्दीकी, दीपक डोहरे, संतोष पटले, भुपेंद्र पटेल, मानकर गुरूजी आदी उपस्थित होते. जिल्ह्यात विदर्भ राज्य निर्मितीचे आंदोलन हळूहळू पेट घेत आहे. त्यामुळे या बाजुने जनमत तयार होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)