शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

१०४९ शाळांमध्ये अक्षर सुधार कार्यक्रम

By admin | Updated: March 5, 2016 01:56 IST

सुंदर अक्षर हे विद्येचे आवश्यक अंग आहे, ही म्हण पुरातन काळापासून लागू पडते. विद्यार्थ्यांना सुंदर अक्षर काढता यावे .....

नरेश रहिले गोंदियासुंदर अक्षर हे विद्येचे आवश्यक अंग आहे, ही म्हण पुरातन काळापासून लागू पडते. विद्यार्थ्यांना सुंदर अक्षर काढता यावे तसेच त्यांनी केलेले लेखन शुध्द असावे यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून प्रयत्न केले जातात. जागतिक शुध्द लेख दिनानिमीत्त गोंदिया जिल्ह्यातील १०४९ शाळांत शुध्द लेखन व अक्षर सुधार कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेतील शिक्षक सुश्रुत लेखनाच्या आधारावर अक्षर सुधार कार्यक्रम अनेकदा राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून ५ मार्च हा दिवस शुध्द लेखन दिन म्हणून साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांत अक्षर सुधार कार्यक्रम व शुध्द लेखन कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली आहे. वाचन लेखन कार्यक्रमाच्या माध्यमातून सुंदर अक्षर काढण्यास शिकवली जाते. शुध्द लेखनासंदर्भात वर्ग शिक्षक जेवढे शिकवेल तेवढेच शुध्द लेखन विद्यार्थ्याला शिकवले जाते. परंतु अनेक शिक्षकांनाच शुध्द लेखन येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे त्या प्रमाणात शुध्दलेखनाचे धडे ते देऊ शकत नाहीत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी शुध्द लेखनात मागे पडतो. शुध्द लेखनासाठी विशेष वर्गाची आवश्यकता असते. परंतु शिक्षण विभागातर्फे विशेष वर्गाची सोय करण्यात आली नाही.