शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
4
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
5
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
6
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
7
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
8
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
9
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
10
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
11
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
12
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
13
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
14
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
15
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
16
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
17
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
18
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
19
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
20
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?

१०० मामा तलावांचे होणार पुनरूज्जीवन

By admin | Updated: January 28, 2016 01:40 IST

सन २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील १०० मामा तलावांचे पुनरुज्जीवन केले जात असून त्यात मत्स्यसंवर्धन केले जाणार आहे.

पालकमंत्र्यांची ग्वाही : लोकचळवळीतून जलयुक्त शिवार यशस्वी करण्याचे आवाहनगोंदिया : सन २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील १०० मामा तलावांचे पुनरुज्जीवन केले जात असून त्यात मत्स्यसंवर्धन केले जाणार आहे. यासोबतच पशुपालन गोठ्यांची निर्मिती केली जात आहे. डिसेंबर २०१५ अखेर त्यावर ८४ कोटी ४९ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी अभियानाला लोकचळवळीचे स्वरु प प्राप्त झाले आहे. यात सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी गावकरी व शासकीय यंत्रणांना उद्देशून केले. पोलीस कवायत मैदानावर मंगळवारी ६७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ना.बडोले बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आ.डॉ. खुशाल बोपचे, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचावण्यासाठी आता नगदी पिकांची कास धरली पाहिजे. दर्जेदार आरोग्यसेवा, रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी व सर्व मुलभूत सोयी सुविधा नागरिकांना उपलब्ध करु न देण्यासोबतच बचत गटातील महिलांना सक्षमतेने जीवन जगता यावे याकरीता विविध योजनांची प्रभावी व नियोजनबद्ध अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी दिली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने सन २०१५-१६ हे वर्ष सामाजिक समता व न्याय वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या योजना लोकाभिमुख करण्यात येतील. जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना आत्मविश्वासाने स्वावलंबी बनविण्याचे कार्य कौशल्य विकास कार्यक्र मातून करण्यात येत आहे. रोजगार मेळावे व प्रशिक्षणाच्या माध्यमातून २२४ युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे तर ३४४ युवक-युवतींनी स्वयंरोजगाराची कास धरली असल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा अवगत व्हावी याकरीता आदिवासी विकास विभाग नागपूर यांचेकडून शब्दकोष अभियान राबविण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गोंदिया जिल्हा व्यसनमुक्त होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय अहेर, जिल्हा क्र ीडा अधिकारी अशोक गिरी यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पोलीस परेडचे संचलन परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी केले. परेडमध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, एन.सी.सी., स्काऊट, पोलीस बँड पथक यांनी सहभाग घेतला. यावेळी समता संदेश रथ, मिशन इंद्रधनुष्य चित्ररथ, सर्व शिक्षा अभियान, सामाजिक वनीकरण, अग्नीशमन दल, श्वान पथक यांनी सहभाग घेतला. यानंतर विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्र म सादर केले. यावेळी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)नवेगावबांधसाठी १५ कोटींचा निधीनैसर्र्गिकदृष्ट्या संपन्न गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास व त्यातून रोजगार क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ११ पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ४८ कोटी ४४ लक्ष रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून नवेगावबांध पर्यटनस्थळाच्या विकासाकरिता राज्य शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.३,७९५ शेतकऱ्यांचे कर्ज माफअस्मानी संकट व नापिकीने त्रस्त जिल्ह्यातील ३ हजार ७९५ शेतकरी बांधवांचे ४ कोटी २३ लक्ष रु पयांचे सावकाराचे कर्ज माफ करु न शेतकऱ्यााच्या समस्येवर राज्य शासनाने प्रभावी उपाययोजना केल्याचे ना.बडोले यांनी सांगितले.