शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांपासून १०० कुटुंबांना पाण्याची सोय नाही

By admin | Updated: May 15, 2017 00:21 IST

येथील कृष्ण वॉर्ड क्रमांक ३ मध्ये सुमारे १०० कूटूंब आहेत. वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याची नळ योजनेद्वारे सोय आहे.

लोकप्रतिनिधींची फक्त आश्वासने : पावसाळ्यातही पाण्यासाठी धावाधाव लोकमत न्यूज नेटवर्क सौंदड : येथील कृष्ण वॉर्ड क्रमांक ३ मध्ये सुमारे १०० कूटूंब आहेत. वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याची नळ योजनेद्वारे सोय आहे. मात्र दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती या योजनेची आहे. उन्हाळा तर सोडा पावसाळ्यातही या वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होत नाही. तर ग्रामपंचायतच्या नळ योजनेलाही पाणी येत नाही. मागील ३० वर्षापासून हाच प्रकार सुरू असून वॉर्डातील १०० कुटुंबीयांची पाण्यासाठी ओरड सुरू आहे. योजनेला पाणी येत नसले तरीही संबंधीत प्रशासन वर्षापोटी ७०० रुपये नळ कनेक्शनचे घेतात. या १०० घरांना वापरण्याकरीता फक्त एक बोरवेल या वॉर्डामध्ये आहे. त्यामुळे महिलांची पाण्याकरीता रोज सकाळी व संध्याकाळी बोअरवेलवर गर्दी होते. अशात पाण्यासाठी येथे वादावादी व भांडणेही होतात. गेल्या अनेक वर्षापासून कित्येक सरपंच, सदस्य व लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन गेले. कामापुरते आश्वासने देवून गरीबांच्या विश्वासघातच त्यांनी केला आहे. सदर वॉर्डातील जनतेला कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना गावच सोडून निघून जावे असे वाटत आहे. या वॉर्डामध्ये दिवाबत्तीची सोय नाही, जाण्यायेण्याकरीता मार्ग व्यवस्थीत नाही, सांडपाणी मार्गी लावण्याकरीता गटारी नाही, पिण्याच्या पाण्याकरीता बोअरवेल किंवा नळ योजना जिवंत स्थितीमध्ये उपलब्ध नाही. तरी प्रशासन वर्षापोटी घर कर वसुली करीत असल्याचे वॉर्डवासी सांगतात. करीता संबंधीत प्रशासनाने नुसते आश्वासन देवू नये तर कामे ही करावे व जनतेच्या पिण्याच्या पाण्याची मुबलक सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायतकडे आजघडीला १४ वित्त आयोगातील १९ लाख रुपये जमा आहेत. मात्र गावातील जनतेला पाण्याची सोय उपलब्ध नसताना पडून असलेल्या या पैशांचा उपयोग काय असा सवाल गावकरी करीत आहेत.