शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काऱ्याला १० वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 22:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या सोनी येथील ३८ वर्षाच्या महिलेवर बळजबरी करणाऱ्या गावातीलच एका आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाचा सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी (दि.१३) रोजी सुनावली.हेमराज फुलीचंद पटले (३८) रा. सोनी असे आरोपीचे नाव आहे. गावात २२ आॅगस्ट २०१३ रोजी कीर्तनाचा कार्यक्रम असल्याने पीडित ...

ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : गावातील कीर्तनाच्या गोंगाटाचा घेतला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या सोनी येथील ३८ वर्षाच्या महिलेवर बळजबरी करणाऱ्या गावातीलच एका आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाचा सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी (दि.१३) रोजी सुनावली.हेमराज फुलीचंद पटले (३८) रा. सोनी असे आरोपीचे नाव आहे. गावात २२ आॅगस्ट २०१३ रोजी कीर्तनाचा कार्यक्रम असल्याने पीडित महिलेचे पती कीर्तन ऐकायला गेले होते. रात्रभर सुरु असलेल्या कीर्तनात लोक दंग असल्याचे पाहून आरोपी हेमराजने पीडित महिलेच्या घरी २३ आॅगस्ट २०१३ च्या पहाटे २.३० वाजता प्रवेश करुन त्याने सदर महिलेचे तोंड दाबून बळजबरी केली. ओरडली तर ठार करीन अशी धमकी दिली. परंतु त्याच्या धमकीला न जुमानता पीडित महिला ओरडली. परंतु लाऊडस्पीकरचा आवाज मोठा असल्यामुळे पीडितेचा आवाज ऐकायला आला नाही. कीर्तनातून तिचे पती घरी परत आले असता हेमराज तिच्यावर अत्याचार करीत असल्याचे लक्षात आले. त्याने पकडून त्याला मारहाण केली. शेजारातील सर्व लोक गोळा झाले व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.गोरेगाव पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात आरोपीविरूध्द ४४८, ३७६, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल टोपे, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन धुमाळ, कर्मचारी महिला पोलीस हवालदार सुधा गणवीर यांनी केली होती.या प्रकरणावर बुधवारी (दि.१३) रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश-२ माधुरी आनंद यांनी सुनावणी केली. या सुनावणीत आरोपीला कलम ३७६ अंतर्गत १० वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, कलम ३२३ अंतर्गत एक महिन्याची शिक्षा, ५०० रुपये दंड, कलम ५०६ अंतर्गत एक महिन्याची शिक्षा १ हजार रुपये दंड, कलम ४४८ अंतर्गत एक महिन्याची शिक्षा व ५०० रुपये दंड ठोठावला आहे.दंडाची रक्कम ७ हजार रुपये वैकल्पिक वाद निवारण केंद्राने वसूल करुन ती पीडितेला देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात न्यायालयात आठ साक्षदार तपासण्यात आले होते. सरकारी वकील म्हणून माजी सरकारी वकील शबाना अंसारी व प्रकाश तोलानी यांनी काम पाहिले.