शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराला १० वर्षाचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:22 IST

लग्नाच्या पूर्वी लग्नाचे आमिष देत जवळीक साधली. परंतु लग्न झाल्यानंतरही जुन्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणाऱ्या खमारी येथील प्रियकराला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी (दि.७) सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लग्नाच्या पूर्वी लग्नाचे आमिष देत जवळीक साधली. परंतु लग्न झाल्यानंतरही जुन्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणाऱ्या खमारी येथील प्रियकराला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी (दि.७) सुनावली. रवि रमेश किरणापुरे (२५) रा. खमारी असे आरोपीचे नाव आहे.रविने गावातीलच २० वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष देत तिच्याशी जवळीक साधली. एप्रिल २०१४ मध्ये त्याचे लग्न झाले. तेव्हा पिडीत मुलीने लग्नासंदर्भात विचारणा केल्यावर तिला सोडून तुझ्याशी लग्न करीन असे बोलून पिडीतेची मनधरणी केली होती. त्यानंतरही तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फेब्रुवारी २०१५ मध्ये तिला गर्भधारणा झाली. याची माहिती त्याला दिल्यावर त्याने जन्माला येणाºया बाळाला मी स्विकारेन अशी ही हमी दिली होती. सहा महिन्याची गर्भवती झाल्यानंतर हे प्रकरण सर्वाना समजले. तिने रविला आपल्या घरी बोलावून लग्नासंदर्भात विचारले असता त्याने लग्न करण्यास होकार देत तिच्या घरुन निघून गेला. त्यानंतर त्याने तिच्या घरी पाय सुध्दा ठेवला नाही. नंतर तिने गोंडस बाळाला जन्म दिला. यासंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (१), ४१७ अन्वये गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक न्हायंदे यांनी केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ शरद त्रिवेदी यांनी या प्रकरणावर सोमवारी सुनावणी केली. कलम ३७६ (१) अंतर्गत १० वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी शिक्षा कलम ४१७ अंतर्गत १ वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली. या दंडातील पाच हजार रुपये पिडीतेला देण्याचा निकाल न्यायालयाने दिला. या प्रकरणात १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. वसंत चुटे यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी खरोले, कºहाडे, वासु देशमुख यांनी काम पाहिले.त्या मुलाचा केला डीएनएरवि रमेश किरणापुरे याने प्रेमसंबंधातून आपल्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने त्याच्या प्रेयसीने गोंडस बाळाला जन्म दिला. ते बाळ रविचेच आहे किंवा नाही यासंदर्भात ही चौकशी करण्यात आली. त्या बाळाचा डीएनए रवि सोबत जुळला असून ते बाळ रविचाच असल्याचे स्पष्ट झाले.