शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण करणाऱ्यास १० हजार रुपये दंड

By admin | Updated: September 21, 2015 01:37 IST

तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील भाऊराव गोंधुळे, लिलाबाई गोंधुळे यांनी पदाचा दुरुपयोग करुन आपले नाव ग्रामपंचायत रेकार्डला नोंदविले.

तिरोडा : तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील भाऊराव गोंधुळे, लिलाबाई गोंधुळे यांनी पदाचा दुरुपयोग करुन आपले नाव ग्रामपंचायत रेकार्डला नोंदविले. या संदर्भात तुळशीराम गोंधुळे यांनी नायब तहसीलदार विलास कोकवार यांच्याकडग केली आहे. दहा हजार रुपये दंड तसेच प्रतिवर्ष ५० रुपये भू. आकारणी असे एकूण १० हजार २५० रुपये वसूल करण्याचे आदेश दिले.अर्जदार टिकाराम गोंधुळे यांना चांदोरी खुर्द येथे १९६३ ला आबादी प्लाट क्र.६२ व ४९ हे वडील श्रीपत गोंधुळे यांना शासनाकडून मंजूर केले आहे. ४९ वर राहते घर, ६२ वर गुरेढोरे, शेतीचे अवजारे ठेवण्यासाठी २०११ ला कच्ची झोपडी बांधली. सदर झोपडी गैरअर्जदार भाऊराव गोंधुळे यांनी पाडून जबरदस्तीने अतिक्रमण करुन प्लाटवर कुंपन घातले आहे.सदर प्रकरणावर नायब तहसीलदार विलास कोकवार यांनी पुढीलप्रमाणे आदेश काढला आहे. गैरअर्जदार लिलाबाई गोंधुळे चांदोरी खुर्द यांच्याकडून सन २०११-१२ ते सन २०१५-१६ या कालावधी करीता प्रतिवर्ष २००० रुपये प्रमाणे पाच वर्षाकरिता १०,००० रुपये दंड व ५० रुपये प्रतिवर्ष भू आकारणी असे १० हजार २५० रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहे. गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्याच्या १५ दिवसाच्या आत अतिक्रमण खाली करावे न केल्यास शसकीय यंत्रणेमार्फत अतिक्रमण हटविण्यात येईल व त्यावर लागणारा खर्च गैरअर्जदाराकडून वसूल करण्यात येईल. मूळ भूखंडधारक तुळशीराम गोंधुळे यांंना मंजूर केलेले भूखंड विहित कालावधीत निवासी प्रयोजनार्थ वापरत आणलेले नाहीत. ही बाब लक्षात घेता त्यांना मंजूर केलेले सदर दोन्ही भूखंड शासन जमा करण्याबाबतचा रितसर प्रस्ताव तलाठी खैरलांजी यांनी स्वतंत्रपणे सादर करावा, असे आदेशात नायब तहसीलदाराने नमूद केले आहे. (शहर प्रतिनिधी)