१ लाख ६ हजारांचा दंड : अवैध रेती, मुरूम व बोल्डरची वाहतूकगोंदिया : विनापरवाना रेती, मुरुम व बोल्डर वाहतूक करणाऱ्या १० ट्रॅक्टर मालकांवर महसूल विभागाने कारवाई केली. यात दंडात्मक कारवाईतून १ लाख ६ हजार रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. १५ व १६ फेबु्रवारीरोजी ही कारवाई करण्यात आली. यात ट्रॅक्टर मालक मेघठनाथ उंदिरवाडे, हंसराज राऊत, रामलाल वैद्य, सुरेंद्र बिसेन यांच्यावर प्रत्येकी १५ हजार ४०० रुपये दंड ठोठावण्यात आला. सतीश नागपुरे यांच्यावर ४९०० रुपये दंड, शोभेलाल कटरे, दुलीचंद रहांगडाले, महेश वलके यांच्यावर प्रत्येकी ७ हजार ९०० रुपये दंड असा एकूण एक लाख सहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सदर कारवाई तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.. (तालुका प्रतिनिधी)
१० ट्रॅक्टर मालकांवर कारवाई
By admin | Updated: February 17, 2017 01:48 IST