शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्त फ्रंटलाईन वर्करसाठी १० टक्के बेड राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST

गोंदिया : कोरोनाग्रस्त फ्रंटलाईन वर्कर यांना प्राधान्याने औषधोपचार करण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राच्या ...

गोंदिया : कोरोनाग्रस्त फ्रंटलाईन वर्कर यांना प्राधान्याने औषधोपचार करण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राच्या गोंदिया शाखेने अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता तथा पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली होती. त्यानंतर शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्त फ्रंटलाईन वर्करसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयात १० टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश काढले आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या मागणीला यश आले आहे.

सद्य:परिस्थितीत कोरोना या संसर्गजन्य रोगाची वाढती परिस्थिती लक्षात घेता अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करीत आहेत. कोरोनाला बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जे अधिकारी, कर्मचारी, पोलीस, आरोग्य, महसूल यांसारख्या शासनाच्या प्रमुख विभागात काम करीत आहेत. ते त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता किंवा आपल्यानंतर आपल्या आप्तांची चिंता न बाळगता आपले कर्तव्य पार पाडत आहेत. याचा परिणाम त्यांच्या आप्तांवर होत आहे. अशा परिस्थितीमध्ये संबंधित कर्मचाऱ्याला किंवा त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबाला जर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल तर राज्यातील चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता वेळेवर रुग्णालय, औषधोपचार वेळेवर मिळत नाही. अनेक ठिकाणी रुग्णांना जीवदेखील गमवावा लागत आहे. त्यामुळे शासनाच्या प्रमुख विभागात काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता प्राधान्याने रुग्णालय, तसेच औषधोपचार व इतर अनुषंगिक बाबी उपलब्ध करून रुग्णावर आवश्यक तो औषधोपचार करण्याच्या अनुषंगाने व्यवस्था करण्याची मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राचे सहसचिव आशिष रामटेके यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली. त्यांचे खासगी सचिव जमीर शेख यांच्याकडे निवेदन होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश काढले आहेत.