शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

देवरी येथे १ लाखांची घरफोडी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

देवरी : येथील जगनाडे चौकातील अशोक अजमेरा (जैन) यांच्या घराची खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपये नगद व ...

देवरी : येथील जगनाडे चौकातील अशोक अजमेरा (जैन) यांच्या घराची खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपये नगद व ५० हजार रुपयाचे चांदीचे भांडे चोरी केल्याची घटना बुधवारी रात्री २.३०च्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार अजय ट्रेडिंग कंपनीचे मालक अशोक अजमेरा (जैन) व त्यांचे दोन भाऊ असा सात लोकांचा परिवार अनुप कृती या स्वत:च्या निवासात आपआपल्या खोलीत होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील काढून घरात प्रवेश केला. तिन्ही भाऊ आपआपल्या खोलीत होते. चोरट्यांनी दोन भावांच्या खोलीला बाहेरून बंद करून हॉलमध्ये ठेवलेल्या बॅगमध्ये दुकानाची ५५ हजार रुपयाची रोकड व देवघरातील ५५ हजार रुपये किमतीचे चांदीचे भांडे चोरी करून तेथून पळ काढला. जैन यांच्या निवासस्थानापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या हायवे नं. ६ जवळील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दोन दुचाकीवर ६ चोरटे जात असल्याचे २.४० मिनिटांनी आढळले. यावरून या चोरीच्या प्रकरणात ६ संशयित चोर असल्याचे बोलले जात आहे. सकाळी ४ वाजता जेव्हा अशोक अजमेरा बाथरूमकरिता उठले तेव्हा त्यांचा दरवाजा बाहेरून लावला असल्याचे आढळले. तेव्हा त्यांनी आपल्या भावास फोन केला. दुसऱ्या भावाच्या रूमचा दरवाजा बाहेरून न लागल्याने ते बाहेर आले व त्यांनी अशोक यांच्या खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना हॉलमधील अस्ताव्यस्त असलेले सामान दिसले. तेव्हा त्यांना कळले की घरात चोरी झालेली आहे. घरात चौकशी केली असता बॅगमधील ५५ हजार रुपये व देवघरातील चांदीचे भांडे ज्यांचे मूल्य ५० हजार रुपये आहे ते लंपास झाल्याचे आढळले. रात्रीच अशोक जैन यांनी पोलिसांना कळविले. देवरीचे ठाणेदार सिंगनजुडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गुरुवारी सकाळी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा २.४० मिनिटांनी दोन मोटारसायकलवर ६ अज्ञात इमस चेहऱ्यावर कापड व हेल्मेट घालून जाताना दिसले. देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केला असून तपास ठाणेदार सिंगनजुडे करीत आहेत.