शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

युवक-युवतीची आत्महत्या

By admin | Updated: February 3, 2016 02:56 IST

फोंडा : पालवाडा-उसगाव येथील रश्मी नागेश गावडे (वय १७) या युवतीने सोमवारी सायंकाळी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला १२

फोंडा : पालवाडा-उसगाव येथील रश्मी नागेश गावडे (वय १७) या युवतीने सोमवारी सायंकाळी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला १२ तास उलटण्यापूर्वीच याच भागातील विश्वनाथ मनोहर गावडे या १९ वर्षीय युवकाने मंगळवारी सकाळी आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने उसगाव भागात खळबळ उडाली. दोन्ही घटनांचा परस्पर संबंध स्पष्ट झालेला नसला, तरी या आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, फोंडा पोलिसांकडून या संशयाला पुष्टी मिळू शकली नाही. प्राप्त माहितीनुसार, रश्मी या नववीतील विद्यार्थिनीने सायंकाळी ४ ते ५.३0 वाजण्याच्या दरम्यान घरात कुणीच नसल्याचे पाहून दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेतला. तिचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांनी तातडीने तिला खाली उतरवून प्रथमोपचार केले व पिळये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची वार्ता काल, सोमवारी पालवाडा भागात पसरली होती. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असतानाच मंगळवारी सकाळी या युवतीच्या घरापासून सुमारे २00 मीटर अंतरावर राहाणाऱ्या विश्वनाथ गावडे या युवकाने आपल्या घरातच गळफास घेतल्याचे उघड झाले. विश्वनाथ सकाळी उठला नसल्याने त्याच्या वडिलांनी त्याला हाका मारल्या असता, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी विश्वनाथच्या खोलीचा दरवाजा तोडला असता, त्याने साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. उत्तरीय तपासणीनंतर फोंडा पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीष नाईक व गिरीश पाडलोस्कर तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)