शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार 'वर्ल्ड रिकोर्ड', पंतप्रधान मोदींच्याहस्ते २६ रोजी उद्घाटन- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By समीर नाईक | Updated: October 6, 2023 16:54 IST

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात विशेष पत्रकार परिषद घेतली.

पणजी: राज्यात ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे, या स्पर्धेची तयारी पुर्णत्वाकडे आली असून, आम्ही स्पर्धेच्या आयोजनासाठी पूर्णपणे सज्ज झालो आहोत. २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान स्पर्धा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २६ रोजी मडगाव येथील फातोर्डा मैदानावर सायंकाळी ६.३० वा या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात विशेष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडामंत्री गोविंद गावडे, भारतीय ऑलिंम्पिक संघटनेचे तांत्रिक कमिटीचे प्रमुख अमिताभ शर्मा, व क्रीडा सचिव स्वेतीका सचेन उपस्थित होते.

या स्पर्धेत २८ राज्य आणि ८ केंद्र शासीत प्रदेशचे खेळाडू, अधिकारी सहभागी होणार आहेत. अधिकृत उद्घाटन २६ रोजी होत असले तरी काही सामने १९ तारखेपासून सुरु होणार आहे, जेणेकरुन स्पर्धा वेळेत संपू शकेल. यापूर्वी या स्पर्धेचे लोगो, मास्कोट, थीम साँग आणि वेबसाईट लाँचचा कार्यक्रम भव्य स्वरुपात पार पडला आहे. आतापर्यंत बऱ्यापैकी साधनसुविधा तयार झाल्या आहेत. जुन्या सुविधांमध्येच ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे, काही खेळांसाठी तात्पुर्ती सुविधा उभारण्यात येणार आहे. या सर्व सुविधा भविष्यातही उपयोगात येणार आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

 स्पर्धा ठरणार 'वर्ल्ड रिकोर्ड' आतापर्यंत ३६ राष्ट्रीय स्पर्धा झाल्या आहेत, परंतुु राज्यात होणारी ३७ वी राष्ट्रीय स्पर्धा सर्वात मोठी स्पर्धा होणार आहे. राज्यात एकूण २८ ठिकाणी ही स्पर्धा होणार असून सुमारे ४३ क्रीडा प्रकार यात असणार आहेत. देशभरातील एकूण १०,८०६ क्रीडापटू यात सहभागी होणार आहे. यातील ४९ टक्के या महिला खेळाडू असणार आहे. तर सुमारे ४७४० तांत्रिक अधिकारी येणार आहेत. आतापर्यंत ३६ क्रीडा प्रकारापेक्षा जास्त क्रीडा प्रकार कुठल्याच स्पर्धेत झालेले नाही, तसेच १० हजार पेक्षा जास्त आणि त्यात ४९ टक्के महिला खेळाडूंचा सहभाग असेही पहिल्यांदाज होत आहे, त्यामुळे ही स्पर्धा 'वर्ल्ड रिकोर्ड' ठरणार आहे, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

दहा ठिकाणी उद्घाटनचे लाईव्ह स्क्रनिंग मडगाव येथील पं. जवाहरलाल नेहरु स्टेडीयम येथे स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. सुमारे १२ हजार प्रेक्षकांच्या क्षमतेचे हे मैदान आहे, त्यामुळे येथे उपस्थित राहणे सर्वांना शक्य नाही, याचा विचार करता राज्यात १० विविध ठिकाणी उद्घाटनचे लाईव्ह स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील रविंद्र भवनचा समावेश असणार आहे. यातून अडीच लाख लोक उद्घाटन पाहु शकणार आहेत. उद्घाटनप्रसंगी लोकांना मोफत प्रवेश असणार आहे, पण गर्दी होणार असल्याने निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे, तर शालेय विद्यार्थ्यांना हातात घालायला बँड देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.

गोव्याची वाटचाल स्पोर्टस् टूरीझम डेस्टीशनकडे राज्यात गेल्या वर्षात मोठ्या प्रमाणात लूसोफोनीया, फीफा महिला विश्वचषक, जागतिक रँकिंग टेबलटेनिस स्पर्धा, सेपक टॅकरो विश्वचषक स्पर्धा या सारखे अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेंचे आयोजन झाले आहे. तसेच आता आर्यनमॅन, जागतिक बीच व्हॉलीबॉल स्पर्धा होणर आहे. यातून राज्याकडे क्रीडा हब म्हणून पाहीले जाते, तसेच यातून पर्यटनाला देखील वाव मिळत आहे. त्यामुळे गोव्याची वाटचाल स्पोर्टस् टूरीझम डेस्टीशनकडे होत आहे, यात शंका नाही, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

खेळाडूंनी या संधीचे सोने करावे: क्रीडामंत्री गोविंद गावडे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजक असल्याने प्रत्येक क्रीडा प्रकारात गोव्यातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा गोमंतकीय खेळाडूंनी करुन घेत गोव्याला पदके मिळवून द्यावीत. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून आपले कौशल्य विकसीत करण्याची चांगली संधी खेळाडूंना आहे. क्रीडा संघटनेंची समस्या आम्ही सोडवीली आहेेत, त्यामुळे त्यांनी खेळाडूंना प्रशिक्षित करण्यावर जास्त भर द्यावे, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतNarendra Modiनरेंद्र मोदी