शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फर्मागुडी येथे ट्रकच्या धडकेने महिला ठार

By admin | Updated: April 12, 2017 02:36 IST

फोंडा : रस्ता अपघातांची मालिका फोंडा परिसरात चालूच असून मंगळवारी एका ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने महिला जागीच ठार झाली.

फोंडा : रस्ता अपघातांची मालिका फोंडा परिसरात चालूच असून मंगळवारी एका ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने महिला जागीच ठार झाली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना कोने-फर्मागुडी येथे घडली. अपघात-स्थळापासून फर्मागुडी पोलीस आउट पोस्ट अवघ्या ५00 मीटरच्या अंतरावर आहे; परंतु अपघातस्थळी पोलीस पोचले चक्क २ वाजून २५ मिनिटांनी, अशी माहिती नागरिकांनी दिली. अ‍ॅम्ब्युलन्सने पोहचण्यासाठी चक्क ४० मिनिटे घेतली.अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव शकीला शेख (४२, रा. शापूर-फोंडा) असे असून ती आपले पती हमीद यांच्यासह दुचाकीवरून गोमेकॉत असलेल्या एका नातेवाईक पेशंटसाठी जेवणाचा डबा घेऊन जात होत्या, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. पती किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक (क्र. जीए ०२ टी ८९८५)ने प्लेजर दुचाकीला मागून ठोकर दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. ट्रक चालक अरुण कुमार शुक्ला (रा. मडगाव, मूळचा उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.दरम्यान, एकीकडे अपघातात एक व्यक्ती प्राण गमावून बसली आहे, तर दुसरीकडे बरेच जण मोबाईलवर फोटो घेऊन ते सोशल मीडियावर लवकरात लवकर शेअर करता यावेत यासाठी धडपड करताना दिसत होते. (प्रतिनिधी)