शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कार्निव्हलला गोव्यात खरेच पर्यटक येतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:56 IST

मडगाव : गोव्यात सरकारी पातळीवर यंदा १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी चित्ररथ मिरवणुका आयोजित करण्यात आल्या आहेत. कोविड असतानाही ...

मडगाव : गोव्यात सरकारी पातळीवर यंदा १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी चित्ररथ मिरवणुका आयोजित करण्यात आल्या आहेत. कोविड असतानाही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा उत्सव आयोजित करणे महत्त्वाचे असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर म्हणतात. मात्र एका बाजूने कोविडची भीती आणि दुसऱ्या बाजूने विमान तिकिटाचे वाढलेले दर यामुळे यावेळी गोव्यात खरेच पर्यटक येतील का हा खरा प्रश्न  आहे.कार्निव्हल नव्हे इंत्रुजगोव्यात पारंपरिक रित्या जो उत्सव साजरा केला जातो त्याला इंत्रुज असे म्हणतात. गोव्यातील पारंपरिक उत्सवात चित्ररथ मिरवणुकीला थारा नाही. गोव्यात आधी या उत्सवाच्या वेळी वेगवेगळे पोशाख परिधान करून मिरवणुका काढायचे. ज्यात पुरुष महिलांच्या वेशातही असायचे. अंगणातील खेळ हा या उत्सवाचा मुख्य भाग होता.खा, प्या, मजा करागोव्यात तीन दिवसांचा कार्निव्हल साजरा केला जात असला तरी यावेळी सरकारी पातळीवर तो दोन दिवसच साजरा होणार आहे. या तीन दिवसांत गोव्यात खा, प्या आणि मजा करा असा माहोल असेल. त्यानंतर गोव्यात लेंट महिना सुरू होतो. या महिन्यात ख्रिस्ती लोक दारू व मांस सेवन करत नाहीत. त्यापूर्वी मजा करण्यासाठी हा सण.चर्चचा नेहमी विरोधकार्निव्हलचा ख्रिश्चनांच्या धार्मिक कार्याशी दुरान्वयेही संबंध नाही. १९८०च्या दशकात गोव्यात ब्राझील कार्निव्हलच्या धर्तीवर चित्ररथ मिरवणुका सुरू झाल्या आणि त्यातून अर्धनग्न महिलांना सादर करण्यास सुरुवात झाल्यावर चर्चने याला विरोध केला. याच्या व्यावसायिकीकरणाला आजही चर्चचा विरोध आहेच.कार्निव्हल पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात ही गोष्ट खरी असली तरी यावेळी विमान तिकिटांचे दर तीन पटीने वाढले आहेत.गोव्यात अजूनही कोविडचे रुग्ण आढळून येत असल्याने हा गर्दी करणारा उत्सव नको. त्यापेक्षा पारंपरिक खेळांना प्राधान्य द्या अशी मागणी होत आहे. पण पर्यटनाचा  मुद्दा पुढे करून हा उत्सव होणारच असा दावा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी केला. मंत्र्यांना कमिशन मिळते अशी टीका विरोधकांनी केली आहे.