शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

'तिळारी'ची उंची वाढवण्याआधी अभ्यास करणार; म्हादई प्रश्नी आम्ही गोव्याबरोबरच - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: June 17, 2023 16:37 IST

धरणग्रस्त २२ कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३३० कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली.

पणजी : तिळारी धरणाची उंची वाढवण्याआधी अभ्यास करणार तसेच म्हादई प्रश्नी आम्ही गोव्याबरोबरच आहोत व एकत्रपणे लढू, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. धरणग्रस्त २२ कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३३० कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली.

'तिळारी' नियंत्रण मंडळाची आज तब्बल दहा वर्षांनी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर तसेच वरिष्ठ उपस्थित होते. निकृष्ट बांधकामामुळे वरचेवर फुटणारे कालवे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन तसेच तिळारीविषयी अन्य महत्वाचे विषय बैठकीत चर्चेला आले. 

'गोवा- महाराष्ट्र भाऊ-भाऊ'

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तिळारीच्या बाबतीत सर्व प्रश्नांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा आणि निर्णयही झालेले आहेत. गोवा आणि महाराष्ट्र भाऊ-भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही तंटे नाहीत. आजची बैठक अतिशय सकारात्मक  झाली. म्हादईच्या बाबतीतही आम्ही गोव्या बरोबरच आहोत.

शिंदे म्हणाले की, तिळारी धरणात भरपूर पाणी आहे. परंतु ते वाया जात आहेत. कालव्यांची दुरुस्ती प्राधान्यक्रमे हाती घेतली जाईल. त्यासाठी उभय राज्यांच्या जलसंपदा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच होईल. युद्धपातळीवर कालवे दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. तिळारी धरणग्रस्तांच्या नुकसान भरपाईचाही प्रश्न होता तोही निकालात काढण्यात आलेला आहे.'

तिळारी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'याबाबतीत सखोल अभ्यास करण्याचा आदेश मी दिलेला आहे. अभ्यासांतीच योग्य तो निर्णय घेतला जाईल.'

२२ कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, तिळारी धरणग्रस्त २२ कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय बैठकीत झालेला आहे.  तिळारीच्या कालव्यांची दुरुस्ती हा प्रमुख विषय होता. ३० दिवसांच्या कालावधीत कालवे दुरुस्त करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दाखवली आहे. तिळारी धरण पेडणे, बार्देस व डिचोली तालुक्यांना तसेच खास करून मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला पिण्याचे पाणी पुरवते. त्यामुळे हे धरण गोव्यासाठी फार महत्त्वाचे आहे.'

सावंत पुढे म्हणाले की, तिळारीची उंची वाढविण्याचा प्रश्नही चर्चेला आला. महाराष्ट्र सरकारने सखोल अभ्यास करूनच यावर निर्णय घेण्याची ग्वाही दिलेली आहे. बैठकीचे आयोजन करण्यासाठी गोव्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :goaगोवाEknath Shindeएकनाथ शिंदेPramod Sawantप्रमोद सावंत