शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पतीकडून पत्नीचा खून

By admin | Updated: September 13, 2014 01:26 IST

मडगाव : पतीने पत्नीवर चाकूने हल्ला चढवून तिचा खून करण्याची खळबळजनक घटना कट्टा-फातर्पा येथे शुक्रवारी सकाळी घडली.

मडगाव : पतीने पत्नीवर चाकूने हल्ला चढवून तिचा खून करण्याची खळबळजनक घटना कट्टा-फातर्पा येथे शुक्रवारी सकाळी घडली. घटनेनंतर जयेश नाईक (वय ३६) हा फरार झाला आहे. मृत जिया नाईक (वय ३५) हिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी हॉस्पिसियोच्या शवागारात ठेवला आहे. पत्नीच्या चरित्र्याबाबत संशयाने घेरल्यानेच जयेशने जियाचा निर्घृण खून केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. जयेशला दारूचेही व्यसन जडले होते. तो जियाकडे सतत पैशाचा तगादा लावत असे, पैशासाठी सोन्याचे दागिने विक, असे सांगून तो तिला मारबडवही करत होता. खुनाची घटना म्हणून या प्रकरणाची कुंकळ्ळी पोलिसांनी नोंद केली आहे. जयेशवर भादंसंच्या ३0२ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. त्याचा शोध चालू असल्याची माहिती उपअधीक्षक मोहन नाईक यांनी दिली. जयेश हा कुवेतमध्ये कामाला होता. वर्षभरापूर्वी तो गोव्यात आला होता, अशी माहिती नाईक यांनी दिली. पती-पत्नी मध्ये गेली अनेक वर्षे भांडणे होत होती. जियाने याबाबत महिला पोलीस विभागाकडेही तक्रारी केल्या होत्या. तीन दिवसांपूर्वी जयेश आपल्याला त्रास करत असल्याची तक्रार जियाने पोलिसांत केली होती. जयेश व जियाला दोन मुले असून सकाळी त्यांना बाळ्ळी येथील शाळेत पोहोचविल्यानंतर जयेश रागाच्या भरातच घरात आला होता. घरात शिरल्यानंतर त्याने मुख्य दरवाजाला आतून कडी घातली व जियाशी भांडण उकरून काढले. दोघांचाही वाद शिगेला पोहोचला होता. शेजाऱ्यांना दोघांचे भांडण ऐकू येत होते. मात्र, नेहमीच या दाम्पत्यांमध्ये भांडणे होत असल्याने सुरुवातीला शेजाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, काही वेळाने जियाच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्यानंतर शेजारी घरासमोर जमले. शेजाऱ्यांनी जयेश जियावर चाकूने वार करत असल्याचे बघून त्वरित कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात माहिती दिली. उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण हे तातडीने घटनास्थळी दाखल होत असतानाच, जयेश दुचाकीवरून पळून गेल्याचे स्थानिकांनी चव्हाण यांना सांगितले. चव्हाण यांनी जयेशचा पाठलाग करण्यासही सुरुवात केली. मात्र, त्यांना चकवा देत जयेशने धूम ठोकली. पोलिसांनी बेतुल, काब द राम, खणगिणी, खोल, तसेच आगोंद भाग पिंजून काढला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तो सापडू शकला नाही. जियाच्या मानेवर, पोटावर तसेच पायावर वार केले होते. जखमी जियाला पोलिसांनी बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनास्थळी तीन चाकू सापडले असून ते जप्त करण्यात आले. (प्रतिनिधी)