शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

गोव्यात महिलांची संख्या राजकारणात अत्यल्प का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 20:21 IST

गोवा अत्यंत चिमुकले राज्य; परंतु जमिनीच्या व्यवहारातील निधीतून जो प्रचंड पैसा उपलब्ध होतो तो राजकारणात गुंतवून त्याद्वारे राजकीय शक्ती वाढविण्याचे काम चालते. आज तरी महिला या प्रकारच्या राजकारणापासून अलिप्त आहेत.

राजू नायक

गोव्यात लोकसभा निवडणुकीत महिलांना फारसे स्थान का नाही, असा प्रश्न काल मला एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने विचारला. प्रश्न खरा होता. गोव्यात ५० वर्षात केवळ एक महिला खासदार बनली आहे. गोव्याच्या दुस-या मुख्यमंत्री शशिकला काकोडकर होत्या. परंतु त्यांच्यानंतर एवढे महत्त्वाचे पद व खासदार म्हणूनही एकही महिला दिल्लीला जाऊ शकली नाही. मागच्या ३९ वर्षाचा धांदोळा घेतल्यास केवळ एक महिलाच खासदार बनली असे नव्हे तर या काळात पुरुष उमेदवारांची संख्या २२७ असता त्या तुलनेत केवळ १०महिलांनी आतापर्यंत लोकसभेची निवडणूक लढविली आहे. यंदाच्या निवडणुकीत दक्षिण गोव्यातून शिवसेनेच्या राखी नाईक तर उत्तर गोव्यातून अपक्ष म्हणून ऐश्वर्या साळगावकर निवडणूक लढवत आहेत. १९८०मध्ये लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे संयोगिता राणो जिंकून आल्या होत्या.

गोवा राज्य स्वत:ला आधुनिक, सुशिक्षित म्हणवते; परंतु महिलांना राजकारणात स्थान आणि आदर का मिळत नाही?आमचे एक संपादक मित्र म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला मोठय़ा संख्येने पुढे येतात. सुरुवातीला पंचायत निवडणुकीत ‘नव:यांच्या बायका’ म्हणून त्या निवडणूक लढवत. परंतु आता त्या स्वबळावर राजकारणात येतात. परंतु जेथे राखीव जागा असतात, त्या पंचायत व पालिका निवडणुकीतच त्यांचे अस्तित्व सीमित राहिलेले आहे. गोवा विधानसभेत सध्या एलिना साल्ढाणा व जेनिफर मोन्सेरात या दोनच महिला आमदार आहेत. त्या दोघांच्याही ‘निवडीमागे’ त्यांचे पती होते. म्हणजे माथानी साल्ढाणा यांच्या मृत्यूनंतर लोकांनी त्या मतदारसंघात एलिना यांची निवड केली तर जेनिफर यांचे पती पणजी उपनगरातले एक प्रभावी नेते मानले जातात.

असे असले तरी महिलांची संख्या गोव्याच्या राजकारणात कमी का?

गोव्यातही राजकारण हे क्षेत्र पुरुषी मक्तेदारीने ग्रासले आहे यात तथ्य आहे. माझ्या मते, उर्वरित भारताप्रमाणेच राजकारण हे गोव्यातही ‘नीच नराधमांचे’ क्षेत्र बनले आहे. त्यामुळे चारित्र्यहनन, धाकदपटशा आणि पैशांचा ओघ या संकटांना महिला बिचकतात.उदाहरण द्यायचे झाल्यास गोव्याचे सारे राजकारण सध्या जमिनींच्या व्यवहाराभोवती केंद्रित झाले आहे. खाणी, कॅसिनो यातून राजकारण्यांना पैसा मिळतोच. परंतु सरसकट सगळीकडे सहज हात धुवून घेण्याजोगे क्षेत्र आहे ते जमीन व्यवहाराचे. त्यामुळे हरित जमिनींचे रूपांतर, तेथे बांधकामाचे क्षेत्रफळ वाढवून घेणे, नियम तोडून बांधकामे करणा-या बिल्डर्सची पाठराखण करणे आणि धाकदपटशा दाखवून सरकारी व ग्रामसंस्थांच्या जमिनी, वनजमिनींवर कब्जा करणे हा राजकारण्यांचा आवडता खेळ झाला आहे व त्यातून त्यांना लोकांवर वचक बसविण्यासाठी भरपूर पैसा उपलब्ध होतो.

महिलांनी अजून तरी या क्षेत्रात शिरकाव केलेला नाही. विधानसभा निवडणूक ही खूपच महाग बनली आहे. गेल्या निवडणुकीपर्यंत एकेका मतदारसंघावर १० कोटी खर्च केले जायचे. २५ हजारांचे छोटे मतदारसंघ असलेल्या राज्यात १० कोटी म्हणजे खूप झाले. काही उमेदवार तर घरोघरी मोटरसायकली वाटतात. १० कोटींवरून आता निवडणूक खर्च २५ कोटींपर्यंत गेला आहे. महिलांना अजून तरी या खेळाची, त्यामुळेच धास्ती वाटते. गोव्यात गुंडपुंड आणि माफियांची दहशतही त्यानिमित्ताने सुरू झाली आहे. महिला आज या परिस्थितीला बिचकून आहेत. उद्याचे सांगता यायचे नाही.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgoaगोवाWomenमहिलाPoliticsराजकारण