शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या योजना गोव्यात का फसतात? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:04 IST

केंद्र सरकारच्या काही योजनांचे निकष लागू होत नसल्याने अनेक योजना गोव्यात फसल्याचे चित्र पहावयास मिळते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेपासून घर बांधणीसाठी सबसिडीची सोय असलेली प्रधानमंत्री आवास योजना ते अलीकडच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेपर्यंत अनेक योजना राज्यात सपशेल अपयशी ठरल्या आहेत.

पणजी : केंद्र सरकारच्या काही योजनांचे निकष लागू होत नसल्याने अनेक योजना गोव्यात फसल्याचे चित्र पहावयास मिळते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेपासून घर बांधणीसाठी सबसिडीची सोय असलेली प्रधानमंत्री आवास योजना ते अलीकडच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेपर्यंत अनेक योजना राज्यात सपशेल अपयशी ठरल्या आहेत.

केंद्राने खेड्यापाड्यांमधील रस्ते सुधारावेत यासाठी ग्राम सडक योजना आणली परंतु या योजनेचा येथे बोजवारा उडाला. ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगांवकर यांना विचारले असता ते म्हणाले की,‘ गोव्यात ग्राम सडक योजना फसण्याचे कारण म्हणजे लोक जमिनी दान करत नाहीत. मोठ्या राज्यांमध्ये सरकारच्या मालकीच्या प्रचंड जमिनी असतात. जमीनमालकांकडेही मोठमोठे भूखंड असतात. गोव्यात लहान भूखंडधारक आहेत. तसेच येथील राहणीमान उच्च दर्जाचे असून गावांनाही निम शहरी स्वरुप आलेले आहे.’

प्रधानमंत्री आवास योजनाही राज्यात फसली. केंद्राच्या या योजनेत घर बांधण्यासाठी १ लाख २0 हजार रुपये सबसिडी दिली जाते परंतु गोव्यातील जमिनी कूळ, मुंडकार आणि मालक यांच्या वादात फसल्याने तीही अडचणीची बाब ठरत आहे. स्वत:च्या मालकीची जमीन असली तरच घर बांधणीसाठी सबसिडी दिली जाते. 

याबाबतीत मंत्री जयेश साळगांवकर म्हणाले की ‘ गोव्यासाठी स्वतंत्र निकष असावेत, अशी मागणी हल्लीच दिल्लीत मंत्र्यांच्या बैठकीत मी केलेली आहे. १00 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहेत. निम शहरी भागांमध्येही घरांच्याबाबतीत गरजूंना त्याचा लाभ घेता येईल.’गृहनिर्माण खातेही साळगांवकर यांच्याकडेच आहे. 

पिक विमा योजनेचाही बोजवारा प्रधानमंत्री पिक विमा योजनाही गोव्यात फसल्याचे स्पष्ट झाले आहे. या खरीप मोसमात राज्यात केवळ ३४१ शेतकºयांनी याचा लाभ घेतला यात ३३३ ऊस उत्पादक, केवळ ७ जण भात उत्पादक तर १ भुईमुग उत्पादन घेणारा शेतकरी आहे. खात्याचे साहाय्यक संचालक चिंतामणी पेरणी यांनी यास दुजोरा दिला ते म्हणाले की, संपूर्ण गावात किंवा वाड्यावर किमान ८0 टक्के पिकाचे नुकसान झालेले असले तरच या विमा योजनेखाली लाभ मिळतो, अन्यथा नाही. ही अट शेतकºयांच्या मुळावर आली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला अटी भरपूर आहेत शिवाय शेतक-यांना हप्तेही भरावे लागतात. त्या तुलनेत राज्य सरकारच्या शेतकरी आधार योजनेला कोणताही हप्ता भरावा लागत नाही. त्यामुळे शेतकरी केंद्र सरकारची ही योजना घ्यायला बघत नाही. आतापर्यंत केवळ १ टक्का शेतजमीनच केंद्राच्या विमा योजनेखाली आलेली आहे. योजनेचे निकष पाहता गोव्यासारख्या राज्यात ही योजना संयुक्तिक नाही. येथे लागवडीखाली असलेले भूखंडही लहान आहेत. 

टॅग्स :goaगोवा