शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ९ भंडारी उमेदवार का पडले?

By admin | Updated: March 16, 2017 01:01 IST

पणजी : भंडारी समाज हा गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्याने ठामपणे भाजपच्याच बाजूने राहिला. गेली वीस वर्षे प्रत्येक विधानसभा

पणजी : भंडारी समाज हा गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्याने ठामपणे भाजपच्याच बाजूने राहिला. गेली वीस वर्षे प्रत्येक विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळी तसाच अनुभव आला; पण या वेळी प्रथमच भंडारी समाजानेही भाजपची साथ सोडून अन्य पक्षांमधील भंडारी समाजातील उमेदवारांना निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. भाजपने उभे केलेले भंडारी समाजातील नऊ उमेदवार पराभूत झाले. यामागील कारणमीमांसा करण्यासाठी भाजपमध्ये विचारमंथन सुरू झाले आहे.सुमारे अडीच लाख लोकसंख्या असलेल्या भंडारी समाजाची व्होट बँक ही कोणत्याही हिंदुत्ववादी पक्षासाठी महत्त्वाची असते. पंचवीस वर्षांपूर्वी भंडारी समाज हा मगोपसोबत राहायचा. १९९४ सालापासून भंडारी समाजाने भाजपची साथ देणे सुरू केले. १९९४ साली जे चार आमदार भाजपचे निवडून आले होते, त्यात श्रीपाद नाईक व नरहरी हळदणकर हे दोघे भंडारी समाजातील होते. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीवेळी भाजपचे तिकीट वाटप करताना भंडारी समाजाला जास्त उमेदवारी दिली व काँग्रेसपेक्षाही जास्त भंडारी समाज आमदार हे भाजपमधून तयार होऊ लागले. या वेळी एकूण दहा भंडारी समाजातील उमेदवार भाजपने दिले. त्यापैकी नऊ जणांचा दणदणीत पराभव झाला. मिलिंद नाईक हे एकटेच कसेबसे टिकले. त्यांचा पराभव केवळ १४० मतांनी टळला. बहुजन समाजाने भाजपची साथ या निवडणुकीवेळी का सोडली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कूळ-मुंडकार कायद्यातील दुरुस्ती हे एक त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. शिवाय या समाजातील काही मंत्र्यांनी लोकांना तसेच आपल्या कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूकही त्यास कारणीभूत ठरली. शिरोड्यात महादेव नाईक, थिवीत किरण कांदोळकर, साळगावमध्ये दिलीप परुळेकर, शिवोलीत दयानंद मांद्रेकर हे पराभूत झाले. त्याशिवाय फातोर्डामध्ये दामू नाईक, वाळपईत सत्यविजय नाईक, सांताक्रुझमध्ये हेमंत गोलतकर, ताळगावमध्ये दत्तप्रसाद नाईक, सांतआंद्रेत रामराव नाईक वाघ हे भंडारी समाजातील उमेदवार पराभूत झाले. काँग्रेसने भंडारी समाजातील पाच जणांना तिकीट दिले होते. त्यात रवी नाईक, सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे, अमरनाथ पणजीकर व उर्मिला नाईक यांचा समावेश होता. यापैकी तिघांचा विजय झाला. शिवाय गोवा फॉरवर्डतर्फे जयेश साळगावकर व विनोद पालयेकर हे भंडारी समाजातील उमेदवार निवडून आले. ज्या मतदारसंघांमध्ये भंडारी समाज विरुद्ध भंडारी समाजातील उमेदवार, अशी लढत झाली, तिथे मतदारांनी बिगरभाजप उमेदवारास साथ दिली.