शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कानठळ्या बसविणारे दारूकाम कोण रोखणार?

By admin | Updated: September 9, 2014 02:11 IST

पणजी : पणजीतील अकरा दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन उत्साहात आणि भव्य मिरवणुकीने झाले. कानठळ्या बसणारे फटाके आणि लाखो

पणजी : पणजीतील अकरा दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन उत्साहात आणि भव्य मिरवणुकीने झाले. कानठळ्या बसणारे फटाके आणि लाखो रुपयांचा चुराडा करणारे प्रदूषणकारी दारूकाम यंदाच्या चतुर्थीलाही पाहायला मिळाले. पणजीतील चार ठिकाणच्या ११ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जनाच्या भव्य मिरवणुकी झाल्या; परंतु पूजनाच्या ठिकाणी, मिरवणुकीच्या ठिकाणी आणि विसर्जनाच्या ठिकाणी फटाके चालू होते. जो प्रकार ११ दिवसांच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी तोच प्रकार ९ दिवसांच्या विसर्जनाच्यावेळीही आढळला. रात्री उशिरापर्यंत फटाके आणि दारूकामाची आतषबाजी चालू होती. सांतइनेज येथील एका मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जनाच्यावेळी मध्यरात्र उलटून दोन वाजेपर्यंत फटाके लावणे चालू होते. कानठळ्या बसणारे आवाज निघत असल्यामुळे या परिसरात राहणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. रात्री कामावरून दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनांपुढे सुतळी ंबाँब टाकले जात होते. चतुर्थीला फटाक्यांची आतषबाजी आता कमी प्रमाणात होत असली तरी सार्वजनिक गणेशोत्सवात हजारो रुपयांचा चुराडा हा केवळ फटाक्यांसाठी आणि दारूकामासाठी केला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आता प्रत्येक वाड्यावाड्यावर असतात. देणग्या घेऊन मिळविलेला पैसाही फटाक्यांवर खर्च केला जातो. काही गणेशोत्सव मंडळे फटाक्यांवर आणि दारूकामावर पैसे खर्च करणार नाही, असे ठरावही घेतात. काही मंडळाच्या घटनेचाच तो भाग असतो; परंतु ऐनवेळी कुणीतरी पुरस्कृत केल्याचे कारण सांगून फटाके लावण्याचे प्रकारही अनेक घडत आहेत. पणजीतील एका गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्याने खासगीत माहिती देताना सांगितले की, ते कमीत कमी एक लाख रुपये खर्च केवळ दारूकामावर करतात. त्यासाठी त्यांना पुरस्कर्तेही मिळतात. ही केवळ एका मंडळाची कथा नसून अनेक मंडळांकडून हाच कित्ता गिरविला जात आहे.