शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘एसआयटी’च्या मनात काय आहे?

By admin | Updated: May 29, 2017 03:36 IST

खाण घोटाळ्यात समन्स बजावल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि खाण खात्याचे माजी संचालक अरविंद लोलयेकर यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : खाण घोटाळ्यात समन्स बजावल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि खाण खात्याचे माजी संचालक अरविंद लोलयेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्यानंतर खाण कंपन्यांचे पदाधिकारी काय करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरले असून त्यावर एसआयटीचीही नीती ठरणार आहे. एसआयटीच्या मनात काय आहे, याचा अंदाज येत नसल्यामुळे खाण कंपन्यांच्या संचालकांनाही धास्ती निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या खनिज घोटाळ्याच्या चौकशीत विशेष तपास पथकाने आठ खाण कंपन्यांना समन्स बजावल्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. अडकलेल्या सर्वांच्याच कोठडीतील चौकशीचा आग्रह आतापर्यंत एसआयटीने धरला आहे. कामत आणि लोलयेकर यांचीही कोठडी हवी असल्याचे प्रतिज्ञापत्र एसआयटीने न्यायालयात सादर केले आहे. नोटिसा बजावताना एसआयटीकडून काही कंपन्यांचे संचालक आणि काही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना चौकशीला बोलावले आहे. त्यामुळे हे अधिकारी थेट चौकशीला हजर राहतील, की त्यापूर्वी खबरदारी म्हणून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतील, याबद्दल उत्सुकता आहे. लुईस बर्जर प्रकरणात चौकशीला बोलावलेले माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांना पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनीच अटक केली होती, तर कामत यांची अटक त्यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे टळली होती.