शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीना राजघटना कळते का?, पत्रकारांवरील निर्बंधामुळे कॉंग्रेसचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:47 IST

पत्रकारितेचा गळा घोटणारे नियम बनविणाºया सभापतीना घटनेचे ज्ञान आहे काय असा प्रश्न कॉंग्रेसचे प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी उपस्थित केला आहे.

पणजी:  पत्रकारितेचा गळा घोटणारे नियम बनविणाºया सभापतीना घटनेचे ज्ञान आहे काय असा प्रश्न कॉंग्रेसचे प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी उपस्थित केला आहे. हे नियम ताबडतोब मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

पत्रकारितेचे स्वातंत्र्य काढून घेण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे आणि गोव्यातही त्याची अंमलबजावणीचे प्रयत्न सुरू आहेत. स्मृती इराणी यांनी जारी केलेले फेक न्युज विरोधी कारवाईचे परिपत्रकही या सरकारच्या धोरणाची प्रचिती देत आहे. गोव्यात वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे हे प्रयत्न निंदनीय तर आहेच,शिवाय घटनाविरोधी असल्याचा दावा त्यांन केला आहे. माहिती हक्क हा घटनात्मक हक्क आहे.  पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. लोकांपर्यंत वस्तुनीष्ठ माहिती पत्रकार पोहोचवितात. पत्रकारांनाच विधानसभेत प्रवेश बंदी करणे ही घटनेची पायमल्ली आहे. सभापती प्रमोद सावंत यांनी राजघटना वाचली आहे काय असा प्रश्नही चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

चोडणकर म्हणाले, ‘१५ हजार खपाची अट पाळून गोव्यातील  दोन चार सोडल्यास कोणतेही वृत्तपत्राचे प्रतिनिधी विधानसभेत प्रवेश करू शकणार नाहीत.  तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांनाही १० हजार हिट्स एका दिवसात मिळणे केवळ अशक्य आहे. याची पूर्ण कल्पनाही सरकारला आहे. मुद्दामहून केलेले हे कारस्थान आहे.’

पाक्षिके मासिके व इतर नियतकालिकांच्या प्रतिनिधींना कायमचा विधानसभा प्रवेश बंद करण्यात  आला आहे. हा अधिकार सभापतीला आहे काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. इलेक्ट्रोनिक माध्यमांना प्रोत्साहन देण्याचे सोडून त्यांचे उच्चाटन सुरू आहे. तसेच भांडवलशाहीचे पुरस्कर्ते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. १० लाख रुपये वार्षिक महसूलीची सक्ती ही धक्कादायक आहे असे ते म्हणाले. हे नियम त्वरित मागे न घेतल्यास कॉंग्रेस पक्ष आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.