शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील सर्व कॅसिनो बंद करा, काँग्रेसच्या बैठकीत ठराव

By admin | Updated: November 14, 2016 20:24 IST

मांडवी नदीतील कॅसिनोंसह राज्यातील सगळेच कॅसिनो बंद केले जावेत, अशी मागणी करणारा ठराव काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सोमवारी मांडून संमत

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 14 - मांडवी नदीतील कॅसिनोंसह राज्यातील सगळेच कॅसिनो बंद केले जावेत, अशी मागणी करणारा ठराव काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सोमवारी मांडून संमत करण्यात आला. ही माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी खासदार शांताराम नाईक यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी दिली.
चोडणकर  म्हणाले, की सर्वप्रथम रवी नाईक यांच्या काळात कॅसिनोस आरंभ झाला. त्यानंतर प्रत्येक सरकारने कॅसिनो सुरू ठेवले. कॅसिनोंचे सामाजिक, आर्थिक व अन्य सर्व प्रकारचे दुष्परिणाम गोमंतकीय सध्या अनुभवत आहेत. कॅसिनोंमुळे पाच हजार कोटींची महसुल गळती होत आहे. सरकारने ताबडतोब मांडवीतील कॅसिनो बंद करावेत. तसेच हॉटेलांमधीलही कॅसिनो सुरू ठेवू नयेत. कॅसिनो कर्मचा:यांचे पुनर्वसन करावे आणि महसुल प्राप्तीचे अन्य मार्ग सरकारने शोधावेत, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
 
पेडण्याहून पदयात्र
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो व विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणो यांनीही कार्यकारिणी बैठकीत भाग घेतला. गोवा सरकारच्या अपयशाबाबत जागृती करण्यासाठी येत्या दि. 27 पासून राज्यात पदयात्र काढावी, असाही निर्णय बैठकीत झाल्याचे चोडणकर यांनी सांगितले. पेडण्याहून यात्रेस आरंभ होईल. एकूण 35 मतदारसंघांमध्ये यात्र फिरेल. काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या घरोघर जाऊन सरकारविरुद्ध आरोपपत्रचे वितरण करत आहेत, असे चोडणकर यांनी सांगितले. 
खास दर्जाच्या मागणीबाबत प्रथम मनोहर र्पीकर व मग मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यू-टर्न घेतला. काँग्रेस पक्ष निवडणूक जाहिरनामा आता तयार करील. आम्ही जी आश्वासने पाळता येतात, अशाच आश्वासनांचा समावेश जाहिरनाम्यामध्ये करू, असेही चोडणकर यांनी सांगितले. आम्हाला आर्थिकदृष्टय़ा खास दर्जा नको. घटनेच्या 371 कलमांखाली गोव्याला विशेष तरतुदी व विशेष अधिकार हवे आहेत. यालाच प्रचलित अर्थाने खास दर्जा म्हटले जाते. आम्ही या विषयाचा केंद्राकडे पाठपुरावा करू, असे खासदार शांताराम नाईक यांनी सांगितले. हा विषय काँग्रेसच्या अजेंडय़ावर आहे, असेही ते म्हणाले.