शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार हेक्टर खाजन जमीन पुनरुज्जीवित करू: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 07:18 IST

आराखडा जाहीर; आव्हाने, नियोजन व व्यवस्थापनावर भर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील तब्बल १३ हजार हेक्टरपेक्षा जास्त खाजन शेतजमीन पुनरुज्जीवित करण्यासाठी व्यवस्थापन आराखडा जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने हा आराखडा आणला असून खाजन जमिनीचे संवर्धन तसेच शाश्वत व्यवस्थापन हा हेतू आहे.

राज्यातील खाजन जमिनी गेल्या तीन हजार वर्षाहून अधिक काळ शेती, मत्स्यपालन आणि मीठ उत्पादनाला ऐतिहासिकदृष्ट्या आधार देत आहेत. सामाजिक-आर्थिक बदल आणि गैरव्यवस्थापनामुळे या जमिनी मुक्तीनंतर क्षीण झाल्या. मोडून पडलेले बंधारे, मानशी यामुळे खाजन जमिनी नष्ट झाल्या. लोकांनी शेती सोडून दिली. बेकायदेशीर मत्स्यपालन, अतिक्रमण आणि प्रदूषण वाढले. पारंपरिक सहकारी संरचनांचे नुकसान झाले. या आराखड्याच्या माध्यमातून आता खाजन जमिनींचे युएव्ही आधारित लिडार व जीआयएस साधनांचा वापर करून क्षारता क्षेत्रांचे मॅपिंग केले जाईल. व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी आणि पुनरावलोकन करण्यासाठी (गोवा भू-वापर कायद्याअंतर्गत वगळता) प्रमुख अधिकारांसह एक समर्पित खाजन मंडळ काम करील. दरम्यान, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी खाजन शेती संवर्धनासाठी सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी करताना असे म्हटले आहे की, व्यापक सल्लामसलतीने आणलेला हा आराखडा खाजन जमिनींच्या पारंपरिक वैभवाचे पुनरुज्जीवन करण्याचे उद्दिष्ट ठेवते. येणाऱ्या पिढ्यांसाठी अन्न सुरक्षा, जैवविविधता आणि हवामान अनुकूलता प्राप्त होईल.

या आराखड्यात काही शिफारशी केलेल्या असून त्यात असे म्हटले आहे की, पुरासंबंधी धोक्याचे मॅपिंग आणि सीआरझेड झोनिंग संरेखित करावे. गावनिहाय मानशींचे मॉनिटरिंग केले जावे. 'करगुट' व 'ज्योती' यासारख्या पारंपरिक भातबियाण्यांचा वापर व्हावा. संस्थात्मक पाठबळासाठीही काही सूचना करण्यात आल्या असून खाजन मंडळ पर्यावरण आणि हवामान बदल खात्याच्या अधीन असेल आणि जमिनींचे कायदेशीर, पर्यावरणीय आणि सामाजिक-आर्थिक व्यवस्थापन करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले जाईल.

आता या गोष्टी होतील

खाजन जमिनींच्या पुनर्संचयनासाठी उपाय म्हणून बंधारे मजबूत करणे, मानशींचे पुनर्वसन करणे, मीठ-उत्पादनाला प्रोत्साहन देणे, पर्यावरणपूरक मत्स्यपालन लागू करणे आणि पारंपरिक शेतीला वाव दिला जाईल. आंतरपीके, सेंद्रिय सुधारणा आणि जैव-निचरा यांना प्रोत्साहन दिले जाईल. मीठ निर्मिती पुन्हा सुरू करणे, तांदूळ आणि मासे उत्पादन सुधारणे आणि समुदाय व्यवस्थापित सिंचन आणि मत्स्यपालनाला समर्थन देणे या गोष्टी आता होतील. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत