शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

तिळारीच्या कालव्यावर आपण अवलंबून नसणार: जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2024 11:31 IST

२०२५ पर्यंत २५० एमएलडी पाणी उपलब्ध; म्हादईबाबत काळजी करण्याची नाही गरज.

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : 'तिळारी'चे कालवे वरचेवर फुटत असल्याने उ‌द्भवणाऱ्या पाणी समस्येची यापुढे गोव्याला झाळ बसणार नाही. डिसेंबर २०२५ पर्यंत अतिरिक्त २५० एमएलडी पाणी उपलब्ध होईल आणि उत्तर गोव्यात पिलर्ण, कळंगुटपर्यंत मुबलक पाणी मिळेल, अशी घोषणा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल विधानसभेत केली.

म्हादईच्या बाबतीत कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, योग्यवेळी प्रवाह प्राधिकरणाने तपासणी केलेली आहे. गोव्याची बाजू भक्कम आहे आणि आम्हाला न्याय मिळेल, असे मंत्री शिरोडकर म्हणाले. जलस्रोत व सहकार खात्याच्या अनुदान मागण्यांवर ते बोलत होते. या मागण्या आवाजी मतदानाने संमत करण्यात आल्या.

शिरोडकर म्हणाले की, पाण्याची गरज भागवण्यासाठी शंभर बंधारे बांधले जातील. काजूमुळ, काकोडा व शिरोडा येथे धरणे येतील, उद्योगांसाठी कुशावती नदीचे कच्चे पाणी घेतले जाईल. २०१४ साली ४५० एमएलडी पाणी मिळत होते. आज हे प्रमाण ८५० एमएलडीवर पोचले आहे. ४० हजार हेक्टर जमीन आम्ही ओलिताखाली आणली आहे व त्याचा ६० ते ७० हजार शेतकरी पिक घेऊन फायदा घेत आहेत. हॉटेले आणि उद्योगांना पुरेसे पाणी मिळत आहे. कच्च्या पाण्याची कोणतीही कमतरता गोव्यात नाही. बेकायदा बोअरवेलवर कारवाई केली जाईल. दरवर्षी ७० बोअरवेल कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.

आमदार जीत आरोलकर म्हणाले की, तलावातील सांडपाणी सोडणाऱ्या टेकडीवरील झोपड्यांमुळे हरमल येथील गोड पाण्याचा तलाव प्रदूषित झाला आहे. या तलावाच्या पाण्यात औषधी फायदे आहेत त्यामुळे या तलावाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. तुये येथील औद्योगिक वसाहतीला कच्चे पाणी देण्याची गरज आहे.

आमदार नीलेश कावाल यांनी म्हादईचा प्रश्न उपस्थित करून राज्यात वीस वर्षात वर्षांनंतर पाण्याची समस्या असेल, याकडेही लक्ष वेधले. पावसाच्या पाण्याचे संचयन कसे करता येईल हे पाहावे लागेल, तसेच राज्यातील नैसर्गिक जलस्रोत कसे वाचवता येतील हे पाहावे लागेल, कुडचडें मतदार संघातील नैसर्गिक झारे यांचे सुशोभीकरण आणि संरक्षण करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. सहकार खात्याच्या अनुदान मागण्यांवर बोलताना सरकारने सहकारी संस्था नोंदणीसाठी कायदा करावा अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की, या वित्तीय संस्था गोव्यात गुंतवणूक करत नाहीत तर त्या गोव्यातील कष्टकऱ्यांचा पैसा लुटतात. संजीवनी कारखान्याच्या साखर सद्यस्थितीला जबाबदार कोण, असा सवालही काब्राल यांनी केला.

मंत्री म्हणाले की, चार सहकारी बैंका थकबाकीदार आढळल्या असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद केले आहेत. सहकार क्षेत्रात सहा महिन्यांचा किया एक वर्षाचा अभ्यासक्रम लवकरच सुरु केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. मांद्रे मतदारसंघात बैलपार येथे प्रकल्प येत आहे. तेथून पेडणे, चांदेल, मोपा विमानतळ, तुये औद्योगिक वसाहतीला १०० एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे, असे शिरोडकर यांनी स्पष्टकेले.

डिचोलीतील पुराचा प्रश्न उपस्थित

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोली मतदारसंघातील नद्या, नाल्यांमध्ये गाळ उपसा न केल्यामुळे पूर आल्याचा मुद्दा उपस्थित केला. तिकारी धरणांचे दरवाजे अधून मधून उघडले जातात याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे, तिळारी कालचे दुरुस्त करण्याचीही गरज आहे. जलस्रोत खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा उपस्थित करून सरकारने त्यांना नियमित करावे, अशी मागणी त्यांनी केली.

गोवा डेअरी नफ्यात

सहकार खात्याच्या अनुदान मागण्यांवर शिरोडकर म्हणाले की, गोवा डेअरी आता नफ्यात आली असून गेल्या सहा महिन्यात दरमहा तीन ते चार लाख रुपयांचा नफा कमावत आहे. दूध उत्पादकांची सबसिडी महिन्याच्या १५ तारीखपर्यंत देण्याचाप्रयत्न राहील, सहकार क्षेत्रात बागायतदार असो किंवा पतसंस्था तब्बल साडेचार लाख कुटुंबे अवलंबून आहेत. गेल्या काही काळात ४१ नवीन सहकारी सोसायट्वा स्थापन झाल्या. राज्यात २४ तासात सहकारी सोसायटी यांची नोंदणी केली जाते.

म्हादईबाबत धूळफेक : विजय सरदेसाई

आमदार विजय सरदेसाई यांनी म्हादईच्या प्रश्नावर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभेत सभागृह समिती स्थापन करण्यात आली परंतु ती निव्वळ डोक्यात धूळफेक करण्याचा प्रकार ठरली. म्हादईसाठी कर्नाटकाविरुद्ध लढण्याइतके आम्ही बलवान नाही. मडगावात वेस्टर्न बायपासमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, हा पूर टाळण्यासाठी काय पावले उचलली याचे उत्तर सरकारने द्यावे. मोपा विमानतळावर जे घडले त्याबाबत जलस्रोत खात्याला धक्का बसला आहे. कारण गावांमध्ये पूर आला आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेवलेल्या नाल्यांची तपासणी विभागाने केलेली नाही, असे ते म्हणाले.

म्हादई प्रश्नी विरोधकांचा हल्लाबोल

यावेळी विरोधी आमदारांनी म्हादईप्रश्नी जोरदार हल्लाबोल केला. सरकारचे हे सर्वांत मोठे अपयश आहे. म्हादईबाबत गोवावासीवांचे हित जपण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. म्हादई नदीवर प्रकल्प उभारण्यासाठी कर्नाटकला मंजूर केलेला डीपीआर मागे घेण्यासाती सावंत सरकारने केंद्र सरकारला सांगावे, अशी आमची अपेक्षा आहे. राज्यातील सरोवरे आणि नद्यांसह साळ नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. अगदी रामसार साइट नंदा तलावातही जलप्रदूषणाची झालेले आहे, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन