शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सचिवांविरुद्ध वॉरंट

By admin | Updated: September 16, 2014 01:22 IST

सुनावणीस अनुपस्थित : राष्ट्रीय हरित लवादाकडून गंभीर दखल

पणजी : गोवा पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने एल. एल. नथुरमल खाण कंपनी, तसेच इतरांविरुद्ध राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी राज्य सरकारतर्फे कोणीही उपस्थित न राहिल्याने लवादाने गंभीर दखल घेऊन मुख्य सचिव बी. विजयन यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले आहे. खाण पूर्वस्थितीत आणण्यासाठी स्वत: मालक प्रयत्न करीत असताना राज्य सरकार त्याबाबत गंभीर नसल्याने लवादाने ताशेरे ओढले असून पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी ठेवली आहे. नथुरमल कंपनीची टीसी क्रमांक ५९/५३ ची खाण पूर्वस्थितीत आणण्यात यावी, यासाठी संघटनेने ही याचिका सादर केली होती. खाणीच्या खंदकांमध्ये पाणी साचल्याने परिसराला धोका निर्माण झाला आहे. माती कोसळण्याची तसेच शेतात पसरून शेती नष्ट होण्याची भीती आहे, असे संघटनेचे म्हणणे होते. खाण कंपनीचा असा दावा आहे की, मायनिंग प्लॅननुसार आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात आली आहे. या खाणीतून पाणी बाहेर जाऊ दिले जात नाही. ते शास्त्रीय पद्धतीने साठवून ठेवले जाते. या भागात ‘पंगारो’ सारख्या स्थानिक झाडांची लागवड करण्याचीही तयारी कंपनीने दर्शविली होती. खनिज काढल्याने तेथे निर्माण झालेले खंदक बुजविण्याची तसेच वृक्ष लागवड आणि अन्य उपाययोजना करण्यास आपण तयार आहे, तथापि राज्य सरकार आपल्याला हे काम करण्यासाठीही खाण भागात प्रवेश करू देत नाही, असे कंपनीचे म्हणणे होते. खंदक भरून, तसेच तेथे वृक्ष लागवड करून ही खाण पूर्वस्थितीत आणण्यासाठी जे काही करणे शक्य आहे ते करण्याची तयारी कंपनीने दाखवली होती; परंतु राज्य सरकारकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीच्या या प्रस्तावावर राज्य सरकारचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्यासाठी सुनावणीला हजर राहावे याकरिता सरकारला नोटिस बजावण्यात आली; परंतु त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले. सरकारच्या वतीने सोमवारी कोणीही उपस्थित राहिला नाही. त्यामुळे न्यायमूर्ती यू. डी. साळवी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. जी. के. पांडे व बी. एस. साजवान यांच्या त्रिसदस्यीय लवादाने वरील आदेश दिला. (प्रतिनिधी)