शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय जिल्ह्यांना अधिसूचनेची प्रतीक्षा

By admin | Updated: May 13, 2015 01:08 IST

उत्तर व दक्षिण या दोन्ही जिल्ह्यांसाठी उपविभागीय जिल्ह्यांंची सरकारने स्थापना करण्याच्या हेतूने अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमले आहेत

उत्तर व दक्षिण या दोन्ही जिल्ह्यांसाठी उपविभागीय जिल्ह्यांंची सरकारने स्थापना करण्याच्या हेतूने अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमले आहेत. उपजिल्हाधिकारी सरकारने नेमला असला तरी उपविभागीय जिल्ह्यांची अधिसूचना सरकारने जारी केली नसल्याने या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात कामाविना बसण्याची वेळ आली आहे. दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात कामे करून घेण्यासाठी पणजी व मडगावात येणे त्रासदायक होत असल्यामुळे सरकारने जानेवारी महिन्यात उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी उपजिल्ह्यात विभागणी केली. उत्तर गोव्यात बार्देस आणि दक्षिण गोव्यात फोंडा असे दोन विभाग तयार करण्यात आले. तयार करण्यात आलेल्या विभागीय कार्यालयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हााधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याकडे उपविभागीय कार्यालयाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला. हे अधिकारी आठवड्यातून दोनवेळा आपल्या कार्यालयात भेट देतात. त्यांची नेमणूक करून चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी उपविभागीय कार्यालय अधिसूचित केले नसल्याने त्यांना आपल्या कार्यालयात भेट देण्यापलीकडे काहीच काम देण्यात आलेले नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना काहीच काम नसल्याने आपल्या कार्यालयात बसून राहावे लागत आहे. तसेच त्यांच्यासाठी अजूनपर्यंत योग्य असा कर्मचारी वर्ग सरकारने उपलब्ध केला नसल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी देण्यात येणारे अधिकारी व उपविभागीय जिल्हा सरकारने अधिसूचित करण्याची गरज आहे, तरच त्याचा फायदा दोन्ही जिल्ह्यांंतील लोकांना मिळू शकतो.