शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पणजीच्या महापौरपदी विठ्ठल चोपडेकर, उपमहापौरपदी अस्मिता केरकर बिनविरोध, उद्या अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 20:45 IST

गोव्यातील एकमेव असलेल्या पणजी महापालिकेच्या महापौरपदी विठ्ठल चोपडेकर आणि उपमहापौरपदी अस्मिता केरकर ही दोघेही बिनविरोध निवडून आली असून सत्ता पुन: बाबुश मोन्सेरात गटाकडे गेली आहे.

पणजी -  गोव्यातील एकमेव असलेल्या पणजी महापालिकेच्या महापौरपदी विठ्ठल चोपडेकर आणि उपमहापौरपदी अस्मिता केरकर ही दोघेही बिनविरोध निवडून आली असून सत्ता पुन: बाबुश मोन्सेरात गटाकडे गेली आहे. भाजपने उमेदवार रिंगणात उतरविले नाहीत. मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती परंतु भाजप गटातून एकही अर्ज आला नाही. निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहणारे आयुक्त अजित रॉय यांनी या प्रतिनिधीला सांगितले की, उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता निकालाची अधिकृत घोषणा केली जाईल.  

३0 सदस्यीय महापालिकेत भाजपकडे १३ आणि बाबुश गटाकडे १५ असे संख्याबळ आहे. महापौर फुर्तादो यांच्याकडे ते स्वत: आणि नगरसेविका असलेली पत्नी रुथ फुर्तादो अशी दोन निर्णायक मतें आहेत. फुर्तादो दांपत्याने भाजपला समर्थन दिल्यास १५-१५ असे समान संख्याबळ होऊन वेगळीच कलाटणी मिळू शकली असती परंतु भाजपने उमेदवार रिंगणात न उतरविल्याने या सर्व गोष्टींवर पाणी फिरले. 

 बाबुशचे पाच नगरसेवक अनुपस्थित 

विठ्ठल चोपडेकर आणि अस्मिता केरकर यांनी दुपारी १२.३0 वाजता निर्वाचन अधिकारी या नात्याने आयुक्तांकडे उमेदवारी अर्ज सादर केले. त्यावेळी बाबुश गटातील १५ पैकी १0 नगरसेवकच उपस्थित होते. उदय मडकईकर, राहुल लोटलीकर, मार्गारिदा कुएलो फर्नांडिस, कांता शिरोडकर व नाझारेथ काब्राल हे पाच  नगरसेवक फिरकले नाहीत. मडकईकर हे खरे तर सुरवातीपासून महापौरपदासाठी इच्छुक उमेदवार होते. लोटलीकर हेही या पदासाठी शर्यतीत होते. परंतु बाबुश यांनी विठ्ठल चोपडेकर यांची निवड केली. 

संख्याबळ नव्हते म्हणून उमेदवार दिले नाहीत : कुंकळ्येंकर 

महापालिकेतील भाजप नगरसेवकांचे मार्गदर्शक तथा माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘आमच्याकडे संख्याबळ नव्हते त्यामुळे उमेदवार रिंगणात उतरवून फायदा नव्हता.’  दरम्यान, भाजपमध्ये गटबाजी झाल्याने उमेदवार दिले नाहीत, अशी चर्चा शहरात होती परंतु कुंकळ्येंकर यांनी ती फेटाळून लावली. भाजपचे तेराही नगरसेवक एकसंध असून कुठलीही गटबाजी नसल्याचा दावा त्यांनी केला.  चोपडेकर आणि केरकर दोघेही गेल्या महापालिका निवडणुकीत प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहेत. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण