शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या बैठकीत विनय तेंडुलकरांची भूमिका स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:19 IST

काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे देणे आणि भाजपामध्ये प्रवेश करणे व त्यावेळपासून सुरू झालेला लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा वाद याबाबतची सगळी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी पक्षाच्या बैठकीत मांडली.

पणजी : काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे देणे आणि भाजपामध्ये प्रवेश करणे व त्यावेळपासून सुरू झालेला लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा वाद याबाबतची सगळी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी पक्षाच्या बैठकीत मांडली. घटनाक्रम त्यांनी सांगत स्वत:ची भूमिका स्पष्ट केली.लोकसभा निवडणुकीवेळी व शिरोडा आणि मांद्रेतील पोटनिवडणुकीवेळी पक्ष संघटना मजबूत असावी या हेतूने बुधवारी भाजपच्या राज्यस्तरीय पदाधिका-यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी तेंडुलकर यांनी सगळे विषय मांडले. भाजपाचे संघटन मंत्री विजय पुराणिक हे या बैठकीला उपस्थित होते. या शिवाय मंत्री निलेश काब्राल, सदानंद शेट तानावडे, सुलक्षणा सावंत, दत्तप्रसाद नाईक, सत्यविजय नाईक आदींनी बैठकीत भाग घेतला. जिथे संघटना कमकुवत वाटते, तिथे ती मजबूत करावी असे बैठकीत ठरले. मडगावमध्ये सर्व मतदारसंघांच्या कोअर टीमच्या प्रमुखांची बैठक बुधवारीच घेण्यात आली. खनिज खाणी लवकर सुरू कराव्यात अशी मागणी काब्राल यांनी बैठकीत केली.

मनोहर पर्रीकर कामावर येणार ?मनोहर पर्रीकर सध्या दोनापावल येथील त्यांच्या निवासस्थानीच आहेत. तेंडुलकर यांनी बैठकीनंतर लोकमतला सांगितले, की येत्या दिवाळीवेळी मनोहर पर्रीकर कामावर रूजू होतील. मनोहर पर्रीकर यांनी तसे आम्हाला यापूर्वी सांगितलेले आहे. मगो पक्षाने फक्त आठ-दहा दिवसांचीच कळ सोसावी. पक्षाचे केंद्रीय नेतृत्वही मगोपशी चर्चा करील. सध्या सरकारी कामाची गती थोडी मंदावलेली दिसते पण मनोहर पर्रीकर रुजू होताच कामांवा वेग येईल. सरकारमधील अन्य मंत्री सक्षम आहेत.

..म्हणे भंडारी सीएम... दरम्यान, भंडारी समाजातील सर्वपक्षीय आजी-माजी आमदारांची पर्वरी येथे मंगळवारी रात्री बैठक झाली. अशोक नाईक यांना समाजाचे अध्यक्ष करावे असे ठरविण्यासाठी ती बैठक होती. त्या बैठकीत मुख्यमंत्री हा भंडारी समाजातीलच असावा अशी मागणी करावी असे काही ठरलेले नाही, असे बैठकीत  सहभागी झालेले दत्तप्रसाद नाईक व इतरांनी सांगितले. मंत्री जयेश साळगावकर यांनीही तसेच सांगितले. ती चर्चा राजकीय नेतृत्व ठरविण्यासाठी नव्हती असे साळगावकर म्हणाले. समाजाच्या काही सदस्यांना श्रीपाद नाईक हे यापुढे मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यामुळे भंडारी सीएम असावा या मागणीसाठी बैठक बोलावली गेली अशी चर्चा पसरली होती पण त्यात तथ्य नाही असे काही सदस्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा