शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी, वाड्यावाड्यांवर एचआयव्हीबाधित रुग्ण!

By admin | Updated: August 12, 2014 01:33 IST

पणजी : राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक वाड्यावर एचआयव्हीची लागण झालेले रुग्ण आहेत, अशी खळबळजनक माहिती आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

पणजी : राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक वाड्यावर एचआयव्हीची लागण झालेले रुग्ण आहेत, अशी खळबळजनक माहिती आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली. राज्यात एचआयव्हीग्रस्त अशा नव्या रुग्णांची संख्या आता कमी होत असल्याचे आढळून येत आहे. २००३ साली एचआयव्हीची लागण झालेले ११00 नवे रुग्ण सापडले होते. नंतरच्या कालावधीत नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत गेले. गेल्या वर्षी सुमारे ५५0 नवे एचआयव्हीबाधित रुग्ण सापडले. राज्यात एचआयव्ही रुग्ण नाहीत, असा एकही गाव व एकही वाडा नाही, असे मंत्री पार्सेकर यांनी नमूद केले. एकमेकांच्या केवळ सहवासातून किंवा स्पर्शातून एचआयव्हीची लागण होते, असा चुकीचा समज काही लोकांमध्ये आहे. तो समज खरा असता, तर राज्यात एचआयव्हीग्रस्तांची संख्या प्रचंड वाढली असती. एचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, याबाबत शासकीय यंत्रणा जागृती करत आहे. कॉलेजमधील तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे, असे पार्सेकर म्हणाले. सरकार एचआयव्हीग्रस्त, कॅन्सरग्रस्त, डायबिटिसग्रस्त व अन्य रुग्णांना आवश्यक ती मदत करत आहे. कॅन्सरवर उपचारासाठी आवश्यक सुविधा गोव्यात नाहीत. यापुढे कॅन्सरमध्ये सुपरस्पेशालिटी विकसित करायला हवी, असे ते म्हणाले. रिवणच्या ‘त्या’ शाळेतील मुलांबाबत गुप्तता पाळायला हवी होती, असे आमदार रोहन खंवटे म्हणाले. आमदार नीलेश काब्राल यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी राज्यातील एचआयव्हीग्रस्त, कॅन्सरग्रस्त, क्षयरोगग्रस्त रुग्णांबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. (खास प्रतिनिधी)