शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

“रोजगार देण्यास गोवा सरकार अपयशी, सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात बेरोजगारी वाढली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 12:53 IST

बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई केला आहे. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यात सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात बेरोजगारी वाढली असल्याचे सांगितले.

तथा फातोड्यांचे सरदेसाई यांनी बेरोजगारांचे तपशीलवार आकडेही त्यांनी यावेळी सांगितले. सेंट्रल फॉर मॉनिटरी इकॉनमीच्या आकडेवारीनुसार गोव्यात बेरोजगारांची टक्केवारी १६.०२ टक्के इतकी आहे. यामध्ये ६५ टक्के घटक ३५ वयोगटाखालील आहे. बेराजगारीमुळे उद्रेक होण्याचा धोका असतो. सरकारने रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारकडे दूरदृष्टी असायला हवी. सरकारने रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्यात १४ हजार अर्ज आले होते. प्रत्यक्षात मात्र ५५७ जणांना ऑफर लेटर मिळाले. हे सरकार निष्काळजी असल्याचा आरोपही सरदेसाई यांनी केला.

जर स्थिती अशीच राहिली तर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या राज्यात गरीब दिवसेगणिक गरीब होत चालला आहे. तर श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे. गोव्याचे भवितव्य पुढे काय होणार याच्याशी सरकारला काहीही वाटत नाही.

महिलांना रोजगार उपलब्ध करून देताना सुरक्षा व वाहतूक व्यवस्था पुरवली पाहिजे. आज गोव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने येथील लोक पोतुर्गीज पासपोर्ट घेऊन परदेशात जात आहेत. त्यांना देशद्रोही संबोधले जाते. सरकारने रोजगार योजना अधिसूचित केली पाहिजे, मोपा विमानतळावर किती गोवेकरांना नोकरी मिळाली, याची आकडेवारी आहे का असा सवालही त्यांनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा