शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Video: गोव्यात पूल कोसळून 50 जण नदीत पडले, एक मृतदेह हाती

By admin | Updated: May 18, 2017 22:26 IST

ऑनलाइन लोकमत मडगाव (दक्षिण गोवा ), दि. 18 : वापर नसणारा जुना पदपूल कोसळून अंदाजे पन्नास ते सत्तर लोक ...

ऑनलाइन लोकमतमडगाव (दक्षिण गोवा ), दि. 18 : वापर नसणारा जुना पदपूल कोसळून अंदाजे पन्नास ते सत्तर लोक जुवारी नदीत पडले.तिस्क-सावर्डे (ता. धारबांदोडा, जि. दक्षिण गोवा) येथे गुरूवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली. 

पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्याचा मतदेहाचा पोलिस नदीपात्रात होडीच्या सहाय्याने शोध घेत होते. ते पाहण्यासाठी बघ्यांची तोबा गर्दी झाली आणि त्यांच्या वजनाने हा पूलच कोसळला. या घटनेनंतर सुमारे 12 ते 15 जणांनी पोहत किनारा गाठला तर सहा जणांना लोकांच्या साहाय्याने बुडताना वाचविले. कोसळलेल्या पुलाच्या भागात लटकलेल्या दहा ते बारा जणांना बाहेर काढले. रात्री साडेनऊच्या सुमारास एकाचा मृतदेह मिळाला.  अन्य बेपत्ता 15 किंवा वीस जणांचा क्रेन तसेच नौदलाच्या होडय़ांच्या सहाय्याने शोध रात्री उशिरार्पयत सुरु राहिला.  त्यामुळे नेमकी आकडेवारी कोणीही ठामपणे सांगू शकत नव्हते. मृतांचा आकडा वाढण्याची भीती घटनास्थळी व्यक्त होत होती. नौदलाचे जवानही मदत करत आहेत.
 
मडगावपासून उत्तरेला तीस किलोमीटरवरील सावर्डेतील या घटनेमुळे खळबळ माजली. सावर्डे दक्षिण रेल्वेचे महत्त्वाचे  रेल्वे स्टेशन.  तेथे हा पदपूल आहे. त्याचा वापर होत नाही. तो गंजलेला आहे.  तो कोसळल्यावर लोकांचा मोठा आरडा-ओरडा झाला. काही कळण्याच्या आत किमान पन्नास ते सत्तर लोक नदीत पडले. 
 
कुडचडे पोलिसांना प्रारंभी एका अनोळखी  व्यक्तीचा मृतदेह जुवारी नदीच्या पात्रात वहात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या साहायाने कुडचडे ते सावर्डेला जोडणा:या पुलाखालून मृतदेह काढण्यास प्रारंभ केला. ते पाहण्या साठी नवीन पुलाच्या शेजारी असलेल्या  सुमारे चाळीस वर्षे जुना आणि सध्या वाहतुकी साठी पूर्ण  बंदच अलेल्या पदपुलावर शेकडो लोक उभे होते. अचानक पद पुलाचा एक भाग कोसळला सुमारे पन्नास ते सत्तर लोक नदीत पडले. अनेकांना पुलाच्या लोखंडी भागांना आपटून जबर मार बसला. त्याही स्थितीत काहींनी पोहत किनारा गाठला. पडलेला पूल क्रेन द्वारे वर खेचला असता पुला खाली दबलेला एक मृतदेह मिळाला.  पोलिसांना बसवराज मरेनवार या सांगे गावातील युवकाचे पाकीट सापडून आले. तो मृतदेह मरेनवार याचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या मागे एक प}ी आणि तीन लहान मुले आहेत.
 
बेपत्ता व्यक्तींची काहीही माहिती नाही, तसेच नदी पात्रात खोलवर जाऊन शोधणारी व्यक्तीही नाही अशा अडचणी पोलिस आणि अग्निशामक दलासमोर होत्या. अग्निशामक दलाची विद्युत सामग्री आणून शोधकार्य हाती घेतले. दांडो- सांगे गावातील फ्रान्सिस फेर्णांदिस यांना बोलावून आणले. त्यांनी नदीत खोलवर जाऊन शोध घेतला. तसेच नौदलाच्या जवानांनीही मोठी मदत केली
 
दरम्यान खासदार नरेंद्र सावईकर यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी नौदलाला मदातीचे आवाहन केले आहे.

https://www.dailymotion.com/video/x844z7t