पूनम गुरव ल्ल नवी मुंबई
दस:यानिमित्त झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असल्याने पुणो जिल्हय़ातील शेतकरी वाशीत दाखल झाले आहेत. मात्र लहरी हवामानाचा या पिकाला बसल्याने यंदा ङोंडुचे उत्पादन कमी झाले. परिणामी वाशीतील बाजारपेठेत गेल्या वर्षीच्या तुलनेत
ङोंडू कमी आल्याने भाव चढले
आहेत. ङोंडसह, शेवंतीने भाव
खाल्ला असून या फुलांचा भाव
12क् रुपये किलोर्पयत गेला
आहे.
जुन्नर, पिंपळगाव- घोडे, खेड- आंबेगाव या तिन जिल्हय़ातील शेतकरी दसरा आणि दिवाळीनिमित्त गेल्या 2क् वर्षापासून व्यवसायासाठी या परिसरात येतात. यावर्षी शेतक:यांनी पिवळा आणि लाल रंगाचा गोंडा, शेवंती आणि अष्टगंधा फुलांना चांगली मागणी आहे.
वाशी सेक्टर - 9 पासून सेक्टर- 17 शिवाजी चौक ते तुभ्रे एमपीएमसी मार्केटपर्यत जवळपास 2क्क् शेतकरी फुले विक्रीसाठी बसले आहेत.
लहरी हवामानाचा फटका
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी झेंडूला लहरी हवामानाचा फटका बसला. हवामानात होणारा बदल, ऐनवेळी पडणारा पासून आणि खतांच्या किंमतीत वाढीमुळे उत्पादन कमी झाल्याचे शेतक:यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक वर्षी हजार किलो फुले आणणारे शेतकरी यावर्षी 3क्क् ते 4क्क् किलोचाच माल विक्रीसाठी घेऊन आले.
फुलांबरोबरच तोरण आणि हार बनवून मिळत असल्याने ग्राहकांना या ठिकाणी चांगली सोय झाली आहे. झेंडूच्या फुलांबरोबर आपटय़ाची पानेही विक्रीसाठी आली आहेत. पिवळय़ा आणि लाल रंगाचा ङोंडूचा भाव प्रति किलो 12क् रुपयार्पयत गेला आहे. तर हारांची किंमत 6क् ते 3क्क् रूपयांपर्यत आहेत. तोरण फुटानुसार तयार करण्यात येत असून 8 फुटाच्या तीन पदरी तोरणाची किंमत 5क्क् ते 55क् रूपये आहे, तर शेवंती आणि अष्टगंधाची फुले 2क्क् ते 3क्क् रूपये किलोपर्यत मिळत आहेत, मात्र झेंडूच्या फुलांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. ग्राहक पाव किलोपासून 3 ते 4 किलापर्यत खरेदी करत आहे.
पनवेल : विजया दशमीनिमित्त पनवेलची बाजारपेठ झेंडूच्या फुलांनी फुलून गेली आहे. सुमारे दहा टन गोंडा विक्रीसाठी आला असून 5क् रुपये किलोने फुलांची विक्री होत आहे. शुक्रवारी दसरा असल्याने ङोंडू आणखी महागण्याची शक्यता आहे. विजयादशमीच्या दिवशी शुभमुहूर्त मानला जात असल्याने यावेळी नवीन वाहने, ग्राहकोपयोगी वस्तूं यांची खरेदी केली जाते. त्याचबरोबर शस्त्रे, वहय़ा पुस्तके, मशनरी यांचीही पूजा केली जाते. या करिता झेंडूची फुलांचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त झेंडूच्या फुलांचे हार घराचे दरवाजे, वाहनांनाही लावले जातात. परिणामी या सणाला झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असते. दरवर्षाप्रमाणो यंदाही पुणो, जेजुरी, अहमदनगर येथील ङोंडू पनवेलमध्ये विक्रीसाठी आला आहे. त्यामध्ये पिवळा आणि केशरी फुलांचा समावेश असून शेवंतीलाही चांगली मागणी आहे.
हवामानात होणारा बदल आणि खतांच्या वाढत्या किंमतीमुळे यावर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पन्न किमी झाले आहे. तरीही शेतक:यांनी सर्व माल याठिकाणी विक्रीसाठी आणला आहे. फुलांबरोबर तोरण, हाराला ही मागणी अधिक आहे.
रघुनाथ टोके, शेतकरी
गेल्या वीस वर्षापासून दसरा आणि दिवळी या सणाला वाशी परिसरात फुलांचा व्यवसाय करत आहे. शेतातील माल थेट विक्रीसाठी येत असल्यामुळे ग्राहकांना वाजवी दरांत माल मिळतो तर शेतक:यालाही चांगला नफा मिळतो.
गोरक्ष नाईक , शेतकरी