शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात हॉटेलांमधील आॅक्युपन्सी २५ टक्क्यांनी घटली

By admin | Updated: November 16, 2016 18:46 IST

नोटाबंदीचा फटका राज्यातील पर्यटन उद्योगालाही बसला असून हॉटेलांमधील सरासरी २५ टक्के खोल्या रिकामी आहेत. किनारे, धार्मिक स्थळे तसेच पर्यटनस्थळांबरोबरच कसिनो आणि बाजारपेठांमध्येही पर्यटकांचे प्रमाण

- मनी एक्स्चेंज आस्थापनांमध्ये नोटांचा अभाव : विदेशी पाहुणे त्रस्त पणजी : नोटाबंदीचा फटका राज्यातील पर्यटन उद्योगालाही बसला असून हॉटेलांमधील सरासरी २५ टक्के खोल्या रिकामी आहेत. किनारे, धार्मिक स्थळे तसेच पर्यटनस्थळांबरोबरच कसिनो आणि बाजारपेठांमध्येही पर्यटकांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. विदेशी पर्यटकांना चलन बदलून घेण्याच्या बाबतीत मोठी समस्या निर्माण झाली आहे. मनी एक्स्चेंज आस्थापनांमध्ये डॉलर्स, पौंड किंवा अन्य विदेशी चलनाच्या बदल्यात भारतीय नोटा देण्यासाठी उपलब्ध नाहीत. विदेशी पाहुण्यांना आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डांवरच व्यवहार करावे लागत आहेत. टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी)चे माजी अध्यक्ष तथा हॉटेल व्यावसायिक राल्फ डिसोझा म्हणाले की, विदेशी पर्यटकांना डॉलरच्या बदल्यात कमी पैसे देऊन बोळवण करण्याचेही प्रकार काही मनी एक्स्चेंज आस्थापनांनी आरंभले आहेत. अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांच्याशी संपर्क साधला असता या दिवसात देशी पर्यटकांची संख्या लक्षणीय असायची. पर्यटकांना खोल्या मिळणे कठीण बनत असे परंतु या वर्षी मोसमाच्या सुरवातीलाच नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांना मंदीला सामोरे जावे लागले. इफ्फी जवळ येत असल्याने पुढील काही दिवसात पर्यटक वाढतील, अशी अपेक्षा असून त्यावरच व्यावसायिकांची मदार असल्याचे धोंड म्हणाले. अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रु झ कार्दोझ यांनी काही विदेशी पर्यटक माघारी गेल्याचे सांगितले. विदेशी चलन बदलून देणाऱ्या आस्थापनांमध्ये नोटांची टंचाई आहे.कसिनोंमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. गिऱ्हाईक नसल्याने काही कसिनोवाल्यांनी प्रवेश शुल्कही न भरण्याची मुभा दिलेली आहे.