शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चिंबल मशिदीत बोलावली तातडीची बैठक, २० जणांना अटक

By वासुदेव.पागी | Updated: November 11, 2023 12:48 IST

चिंबल येथील मशीदमध्ये शुक्रवारी  तातडीची बैठक बोलावल्याचे कळताच जुने गोवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून २० जणांना अटक केली.

पणजी: चिंबल येथील मशीदमध्ये शुक्रवारी  तातडीची बैठक बोलावल्याचे कळताच जुने गोवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून २० जणांना अटक केली. मशीद समितीतील दोन गटांत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावल्याची पोलिसांना ही कारवाई करावी लागली. 

चिंबलच्या अंजुमन तोहिदूल मुस्लीमन मशीद समितीत  काही मुद्यांवरून दोन गट पडले आहेत. या समितीचे अध्यक्ष असलेले रशिद बद्रापूर यांनी अलिकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले नव्हते. त्यानंतर मौनाली शेख हे अध्यक्ष बनले होते. शेख हे भाजपच्या  अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्षही आहेत. नवीन अध्यक्षांची कार्यपद्धती काहींना मान्य नसल्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला होता. विशेषतः स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याच्या नवीन समितीच्या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला आहे. कारण  मशीद समितीच्या अधीनियमात स्वीकृत सदस्यांची तरतूद नाही असे त्यांचे म्हणणे आहे. नवीन अध्यक्षांवरही अविश्वास व्यक्त करून नव्याने निवडणुका घेण्याची मागणी काहींनी केली आहे. त्यामुळेच शुक्रवारी संध्याकाळी २ वाजता तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. 

या बैठकीत दोन्ही गटातील सदस्य उपस्थित असल्यामुळे वातावरणही बरेच तापले होते. बैठकीत तणाव निर्माण होत असल्याचे संकेत मिळताच याची खबर कुणी तरी जुने गोवे पोलिसांना देण्यात आली. जुने गोवे पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन उभय गटातील १० -१० मिळून २० सदस्यांना अटक केली.  जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेली कारवाई ही अनुचित प्रकार होऊ न नये यासाठी खबरदारी म्हणून केली होती. अटक करण्यात आलेल्यांना गोमेकॉत वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना उशिरा सोडण्यात आले.