शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच गणवेश, रेनकोट!

By admin | Updated: May 12, 2015 01:57 IST

पणजी : शिक्षण क्षेत्रातील उणिवांची पुरती जाणीव असलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे यंदा विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट शैक्षणिक वर्षाच्या

पणजी : शिक्षण क्षेत्रातील उणिवांची पुरती जाणीव असलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे यंदा विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्राप्त होणार आहेत. त्यासंबंधीची ‘कुपन्स’ संबंधित खात्याला यापूर्वीच पाठविण्यात आली असून ३० मे पर्यंत ती सर्वत्र उपलब्ध होणार आहेत, जी दुकानामध्ये देऊन या वस्तू प्राप्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘लोकमत’ला आज ही माहिती दिली. ते म्हणाले, खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांनी प्रत्येक तालुक्यात दुकाने निवडून त्यांच्यामार्फत या वस्तू वितरित करण्यास सांगण्यात आले आहे. ही कुपन्स घेऊन दुकानात गेल्यानंतर पालकांना जर उंची वस्तू खरेदी करायच्या असतील तर फरक भरून त्या प्राप्त करू शकतील. ‘विद्यार्थ्यांना हव्या त्या आकाराचा गणवेश शिवून घेण्याचीसुद्धा मुभा राहील, एवढेच की त्यांना किमतीतील फरक भरावा लागेल’, असे मुख्यमंत्री म्हणाले.शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांना यापूर्वीच या वस्तू प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना लागणारी कुपन्स पाठविण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिश: रस घेतल्यामुळे यंदा ती शाळा सुरू होण्यापूर्वीच प्राप्त होतील, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. पाठ्यपुस्तकातच रहदारी नियमरस्ता अपघातास कारण होऊन मृत्युमुखी पडणारी मुले बहुतांश १८ ते ३० वयोगटातील असल्याचे आढळल्याने पाठ्यक्रमातच रस्ता सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून उपाय योजण्याचे शिक्षणमंत्रिपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे.लहानपणापासून त्यांच्या मनावर रस्ता सुरक्षेचे महत्त्व बिंबविले तर तेच उद्या पालकांवर उपाय योजण्यासाठी तगादा लावतील, असे सांगून स्कूटर सुरू करणाऱ्या आई-वडिलांनाच मुले हेल्मेट देऊ लागली तर त्याचा विधायक परिणाम होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘अशा शिक्षणामुळे मुलेच आपल्या पालकांना ‘सीट बेल्ट’ लावण्याचा घोशा लावतील.’आता रहदारीविषयक नियम सक्तीचे करण्यासाठी रस्त्यारस्त्यांवर सीसीटीव्ही लावण्यास पर्याय राहिलेला नाही. रहदारीचे नियम तोडणारा वाहनचालक आपल्याबरोबर इतरांचेही जीव धोक्यात आणीत असतो, तेव्हा अशा लोकांना आता कडक शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.(विशेष प्रतिनिधी)