शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

गणवेश, रेनकोट,

By admin | Updated: June 6, 2014 01:55 IST

सदगुरू पाटील ल्ल पणजी नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी व पालकांची गैरसोय सुरू झाली आहे.

सदगुरू पाटील ल्ल पणजी नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी व पालकांची गैरसोय सुरू झाली आहे. गणवेश, रेनकोट व वह्यांचा पत्ताच नाही, असा अनुभव या वर्षीही विद्यार्थी व पालकांना आला आहे. या वर्षी जेव्हा नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल, तेव्हा अगोदरच शाळांमध्ये गणवेश, रेनकोट वगैरे साहित्य पोहोचलेले असेल, असे सरकारने यापूर्वी जाहीर केले होते; पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. पावसाळा आता सुरू होत असतानाच आमच्या मुलांकडे गणवेश नाही असा अनुभव या वेळीही आम्हाला येत आहे, असे काही पालकांनी सांगितले. अजून गट शिक्षणाधिकार्‍यांच्याच कार्यालयात रेनकोट, गणवेश, वह्या असे साहित्य पोहोचलेले नाही. गट शिक्षणाधिकार्‍यांकडे हे साहित्य पोहचेपर्यंत जुलै महिना उजाडेल. त्यानंतर भागशिक्षणाधिकारी ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते करेपर्यंत आणखी एक-दोन आठवडे जातील, हे स्पष्ट आहे. गणवेश हे सरकारी प्राथमिक शाळांमधील पहिली व तिसरी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना दिले जातात. रेनकोट आणि वह्यांचे वाटप अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना केले जाते. मात्र, या वेळी अजून वह्या नाहीत, रेनकोट आणि गणवेशही नाही, अशी माहिती मिळाली. शिक्षण खात्याने याला दुजोरा दिला. आम्ही यापुढे या सगळ्या साहित्याचा पुरवठा करू, असे खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले. यापूर्वीच्या काळातील वार्षिक अनुभव लक्षात घेऊन शिक्षण खात्याने पूर्वनियोजन आणि व्यवस्था करायला हवी होती; पण तसे घडले नाही, असे पालकांचे मत आहे. पावसात मुलांना भिजत जावे लागते. सरकार रेनकोट देईल म्हणून पालकही रेनकोट विकत घेत नाहीत. ग्रामीण भागातील काही पालकांची तर आर्थिक स्थितीच रेनकोट, गणवेश वगैरे खरेदी करण्यासारखी नसते, असे काही शिक्षकांचेही म्हणणे आहे. रेनकोटबाबत विलंब झाल्यानंतर आता शिक्षण खात्याने मुलांना कुपन द्यायचे ठरवले आहे. ते कुपन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी बाजारातून स्वत:ला हवा तो रेनकोट खरेदी करायचा, असे तत्त्वत: शिक्षण खात्याने ठरवले आहे. हीच पद्धत शिक्षण खात्याने यापूर्वीच सुरू केली असती, तर एव्हाना विद्यार्थ्यांच्या हाती कुपन्स तरी पोहोचली असती. शिक्षण खात्याने रेनकोट, गणवेश, वह्या किती विद्यार्थ्यांना लागतील, याचा अंदाज घेण्यासाठी विद्यालयांमधील विद्यार्थी संख्या गेल्या शुक्रवारी गट शिक्षणाधिकार्‍यांकडून मागवून घेतली.