शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी मरियमची अजूनही पडत नाही आई-वडिलांशी गाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:29 IST

एका वर्षापूर्वी आई वडिलांपासून ताटातूट झालेल्या मरियमचा पत्ता गोवा पोलिसांना लागला असला तरी तिच्या आई वडिलांचा नेमका पत्ता कुठे याचा अजूनही ठाव-ठिकाणा लागला नाही. 

मडगाव: एका वर्षापूर्वी आई वडिलांपासून ताटातूट झालेल्या मरियमचा पत्ता गोवा पोलिसांना लागला असला तरी तिच्या आई वडिलांचा नेमका पत्ता कुठे याचा अजूनही ठाव-ठिकाणा लागला नाही. 

 11 महिन्यापूर्वी या बालिकेचे मडगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म 1 वरुन अपहरण करण्यात आले होते. सदर बालिका आपल्या आईच्या कुशीत झोपलेली असताना रिझवान नावाच्या एका संशयिताने तिचे अपहरण केले होते. तो तिला घेऊन प्रथम मुंबई रेल्वे स्थानकावर व नंतर भोपाळला गेला होता. रिझवानने त्या तीन वर्षीय बालिकेला भीक मागण्याच्या धंद्याला लावले होते. अशाच परिस्थितीत भीक मागताना ती भोपाळ रेल्वे पोलिसांच्या नजरेस पडल्यानंतर तिचा ताबा घेऊन तिची रवानगी तेथील बाल निवारागृहात करण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात हाती लागलेल्या संशयिताच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन तब्बल 11 महिन्यानंतर संशयित रिझवान याला मंगळुरु येथून अटक करुन मडगावच्या कोंकण रेल्वे पोलिसांनी गोव्यात आणले. संशयिताने गुन्हय़ाची कबुली दिल्यानंतर त्या बालिकेचा ताबा घेण्यासाठी कोंकण रेल्वे पोलीस भोपाळला गेले होते. मात्र भोपाळ पोलिसांनी बालिकेच्या पालकाविषयी विचारणा करीत या बालिकेचा ताबा गोवा पोलिसांना देण्यास नकार दिल्याने त्यांना परत यावे लागले होते.

अपहरण झालेल्या त्या बालिकेचे पालक पूर्वी हुबळी येथे रेल्वे स्थानकाजवळ राहत होते. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न गोवा कोंकण रेल्वे पोलिसांनी केला होता. मात्र तिच्या पालकांनी आपले वास्तवाचे ठिकाण बदलल्याने अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही.

टॅग्स :goaगोवा