शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

तियात्रिस्तांचा आवाज दडपण्याचा प्रकार

By admin | Updated: August 5, 2014 01:47 IST

पणजी : पर्रीकर सरकारच्या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेले नाही, असा आरोप करत आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावच्या रवींद्र भवनात

पणजी : पर्रीकर सरकारच्या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेले नाही, असा आरोप करत आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावच्या रवींद्र भवनात तियात्रिस्तांकडून घेतल्या जात असलेल्या हमिपत्राबद्दल कडाडून टीका केली. कला व संस्कृती खात्याच्या अनुदान मागण्यांवेळी ते बोलत होते. तियात्रांमधून सरकार, मंत्री, आमदार किंवा अतिमहनीय व्यक्तींवर कोणतीही टीका करणार नाही, असे लेखी लिहून घेतले जाते. टीका केल्यास पुढे बुकिंग दिले जाणार नाही, अशीही भीती घातली जाते. ही अघोषित आणीबाणीच आहे, असे सरदेसाई म्हणाले. एकीकडे तियात्रिस्तांना अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे अशा पद्धतीने त्यांची तोंडे बंद करायची हा कुठला न्याय, असा संतप्त सवाल त्यांनी केला. या रवींद्र भवनात आर्थिक गोलमालही चालू आहे. साडेचार कोटी खर्च केले. त्यातील अनेक व्यवहार प्रश्न उपस्थित करण्यासारखे आहेत. निवडणूक आचारसंहितेच्या काळातही खर्च करण्यात आल्याचे सरदेसाई म्हणाले. दरम्यान, आमदार बेंजामिन सिल्वा, मिकी पाशेको यांनी तियात्रिस्तांवरील बंधनांचे स्वागत केले. काही तियात्रिस्त राजकारण्यांकडून पैसे घेऊन कांतारा रचतात, असा आरोप आमदार कायतान सिल्वा यांनी केला. मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी आरोपाला उत्तर देताना खात्याने तियात्रिस्तांकडून हमिपत्र घ्यावे, यासाठी कोणतेही परिपत्रक काढलेले नसल्याचा खुलासा सभागृहात केला. (प्रतिनिधी)