शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

म्हादई नदीत दोन युवकांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: May 8, 2015 01:17 IST

वाळपई : म्हादई नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संदेश विठ्ठल कुडसेकर, (वय ३९, रा. धावे-सत्तरी)

वाळपई : म्हादई नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संदेश विठ्ठल कुडसेकर, (वय ३९, रा. धावे-सत्तरी) याचा मृतदेह सोनाळ-सत्तरी येथे म्हादईच्या काठावर तरंगताना दिसला, तर सोनाळ-सत्तरीतच ‘मोवाचो गुणो’ या पर्यटनस्थळावर सहलीसाठी आलेल्या रोनक पिंटो, (वय २३, रा. पर्रा-बार्देस) याचा सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. दोघांचा मृत्यू म्हादई नदीवरच वेगवेगळ्या ठिकाणी झाला. संदेश याचा मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर ग्रामस्थांनी वाळपई पोलिसांना माहिती दिली. संदेश बुधवारी आंघोळीसाठी म्हादई नदीत गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढला. संदेश विवाहित होता. तो आपल्या आई व पत्नीसह राहात होता.‘मोवाचो गुणो’ या पर्यटनस्थळावर ९ जणांचा गट सहलीसाठी आला होता. आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने रोनक पिंटो हा पाण्यात बुडाला. त्यानंतर गावातील लोकांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला.वाळपई पोलीस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. संदेश याचा मृतदेह चिकित्सेनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, तर रोनक याचा मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला. रोनक हा व्यावसायिक होता. चार भावांत तो थोरला होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.(प्रतिनिधी)