फोंडा : नव्याने उत्खनन केलेल्या खनिज मालाच्या वाहतूक दराच्या प्रश्नावरून अखिल गोवा ट्रकमालक संघटनेने सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी चिघळले. संघटनेतर्फे येथून सुमारे १५ किलोमीटरवरील बॉम्बे रोड पाळी येथे निदर्शने करण्यात आली. निदर्शक आणि पोलीस यांची संयुक्त मामलेदारांशी बोलणी सुरू होती. बोलणी सुरू असताना सेसा कंपनीचे कर्मचारी त्यांच्यापासून हाकेच्या अंतरावर येऊन थांबले होते. या वेळी संतप्त ट्रकमालकांनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी केलेल्या लाठीमारीत दोन युवक जखमीही झाले. दरम्यान, येथून सुमारे अठरा किलोमीटरवर सुर्ल येथे एक ट्रक पेटविण्यात आला. दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली. (पान २ वर)
ट्रकमालकांचे आंदोलन चिघळले
By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST