शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर कुंकळ्ळीत प्रक्षोभ

By admin | Updated: May 5, 2015 01:03 IST

सविस्तर वृत्त असे की, सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चिंचवाडा- आंबावली येथील आलिटो फर्नांडिस (वय २७) हा युवक आंबावलीहून

सविस्तर वृत्त असे की, सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चिंचवाडा- आंबावली येथील आलिटो फर्नांडिस (वय २७) हा युवक आंबावलीहून कुंकळ्ळीमार्गे आपल्या कामाला जात होता, तर एक मासळीवाहू ट्रक आंबावलीमार्गे कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील फिश मिलमध्ये मासळी घेऊन जात होता. सावरकट्टा येथे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या बॅरिकेडचा अंदाज न आल्याने आलिटो याने आपली मोटारसायकल बाजूला घेतली असता, ट्रकची धडक त्याला बसली. ट्रकच्या पुढील चाकाखाली सापल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्या ठिकाणी लोक गोळा होऊ लागल्याचे पाहून पोलिसांनी पंचनामा करून युवकाचा मृतदेह व त्याची मोटारसायकल तेथून हलविली. या कृतीला आक्षेप घेत स्थानिकांनी पोलिसांना जाब विचारला. पंचनाम्यात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून ट्रकचालकाला वाचविण्याचा पोलिसांचा डाव असल्याचा आरोप करून संतप्त नागरिकांनी युवकाचा मृतदेह घटनास्थळी आणण्याची मागणी केली. त्याचबरोबर पुन्हा पंचनामा करण्याची मागणी लावून धरत पोलिसांशी हुज्जत घातली.दरम्यान, संतप्त जमावाने अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकची तोडफोड केली. तसेच साध्या वेशातील पोलीस शिपायाला जबर मारहाण केली. या पोलिसाला उपचारासाठी नेण्याकरिता आणलेल्या पोलीस व्हॅनवरही दगडफेक करत नुकसान केले. संतापलेल्या लोकांना कुंकळ्ळीचे आमदार राजन नाईक, मडगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. परेरा व आंबावलीचे माजी सरपंच डॉ. बाळे यांनी घटनास्थळी जाऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याही प्रयत्नाला यश आले नाही. लोकांनी रस्ता रोखून धरल्याने वाहतूकही खोळंबली. शेवटी खवळलेल्या जमावाला काबूत आणण्यासाठी अधिक पोलीस कुमक मागविण्यात आली. मडगावचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक, मायणाचे निरीक्षक हरिष मडकईकर व पोलीस उपअधीक्षक मोहन नाईक कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले; मात्र जमावाने आलिटो याचा मृतदेह घटनास्थळी आणण्याची मागणी करत पोलिसांशी हुज्जत घातली. जमावाने कुंकळ्ळीचे पोलीस निरीक्षक राम आसरे व उपनिरीक्षक चव्हाण यांनाही धक्काबुक्की केली.संतप्त जमावाने मासळीवाहू ट्रकच्या टायरातील हवा काढून ट्रक हलविण्याचा पोलिसांचा प्रयत्न उधळून लावला. काहींनी ट्रकला आग लावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो यशस्वी होऊ दिला नाही. सुमारे चार तास चाललेला प्रक्षोभ आटोक्यात आणण्यासाठी शेवटी पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, संतप्त लोकांनी उशिरापर्यंत ठाण मांडून पोलिसांच्या नाकी दम आणला.या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक शिरगू शेख याला अटक केली आहे. उशिरापर्यंत पोलीस जमावाला समजविण्याचा प्रयत्न करत होते. (प्रतिनिधी)